+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान
1001130166
1000995296
schedule01 Jul 24 person by visibility 350 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : निपाणीतील तेरा युवक पावसाळी पर्यटनासाठी काळम्मावाडी धरण परिसरात गेले. त्या तरुणापैकी एक जण काळम्मावाडी धरणासमोरील दूधगंगा नदी पाात्रातील डोहात उतरला. त्याला पोहताही येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे डोहात बुडू लागला. त्या तरुणाला वाचविण्यासाठी दुसऱ्या एका तरुणांन डोहात उडी मारली. त्या तरुणापर्यंत पोहचला देखील. पण एकाने दुसऱ्याला मिठी मारली. मात्र पाण्याला वेग असल्यामुळे दोघेही वाहून गेले. त्या दोघांचा शोध सुरू आहे. सोमवारी एक जुलै रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
निपाणी आंदोलननगर येथील तेरा मित्रांचा ग्रुप सोमवारी वर्षा पर्यटनासाठी काळम्मावाडीला गेला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गणेश चंद्रकांत कदम हा विद्यार्थी नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला. त्याला पोहता येत नव्हते. त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडू लागला. ते पाहून चालक प्रतीक पाटील हे गणेश कदम या तरुणाला वाचविण्यासाठी डोहात उडी घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांनी मिठ्ठी मारली. त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. पाण्याच्या प्रवाहासोबत दोघेही वाहून गेले. पोलिस प्रशासन, जीवरक्षक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविली. संध्याकाळनंतर शोधमोहिम थांबविली.