+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान
1001130166
1000995296
schedule25 Jul 24 person by visibility 1038 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गेल्या काही दिवसापासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये २६ व २७ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाळा व महाविद्यालयांची सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडया, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक – माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये, व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्याना सुट्टी राहील. या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे काम पाहावे असे आदेशात म्हटले आहे. सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना हा आदेश बंधनकारक आहे असे म्हटले आहे.