महापालिका उपायुक्त कपिल जगताप यांची बदली
schedule16 Sep 25 person by visibility 77 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील उपायुक्त कपिल जगताप यांची सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली.राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने सोळा सप्टेंबर २०२५ रोजी बदलीचे आदेश काढले आहेत. मलकापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर उपायुक्त जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. अवर सचिव अ. का. लकास यांच्या सहीनिशी बदलीचे आदेश निघाले आहेत.