रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे हॉटेल सयाजीत यामिनी प्रदर्शन
schedule16 Sep 25 person by visibility 23 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ गार्गींजतर्फे १९ ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हॉटेल सयाजीमधील मेघ मल्हार हॉल येथे यामिनी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. अशी माहिती क्लब अध्यक्षा अंजली मोहीते, इव्हेन्टचे चेअरमन बिना जनवाडकर, को-चेअरमन डॉ. हेमलता कोटकर, सेक्रेटरी सविता पदे, रोटरी सदस्य सौ. साधना घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदर्शनाचे हे बारावे यशस्वी वर्ष असून या वर्षी प्रदर्शनात पुणे येथील एक्सकॅलुसिव्ह रिअल ज्वेलर्स विथ युनिक डिझाइन्स, मुंबई पोल्की, रिअल डायमंड्स, लॅबग्रोन डायमंड्स, संपूर्ण भारतामधील तसेच इंदोर, जयपूर, गोआ, बेंगलोर, दिल्ली येथील विविध प्रकारच्या होम डेकोर्स फॉर फेस्टीव्हस स्टॉल्स असे १०० हुन अधिक स्टॉल्स असलेले हे यामिनी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपच्या शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सतेज पाटील,डी वाय पाटील ग्रुपचे संजय डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील डिस्ट्रिक गव्हर्नर अरुण भंडारी, असिस्टंट गव्हर्नर हर्षवर्धन तायवडे पाटील, रोटरी मुव्हमेंट कोल्हापूरचे प्रेसिडेंट रो. शितल दुगे यांची उपस्थिती असणार आहे.
हे प्रदर्शन १९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ९ आणि २० व २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी क्लबच्या अध्यक्षा अंजली मोहिते, डॉ.हेमलता कोटकर, बिना जनवाडकर, सविता पदे साधना घाटगे, शोभा तावडे, यामिनीच्या सदस्या रेणुका सप्रे, दीपिका कुंभोजकर, कल्पना घाडगे, गीता पाटील, योगिनी कुलकर्णी, जया महेश्वरी, सुरेखा इंग्रोळे, सुजाता लोहिया प्रयत्नशील आहेत.