+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान
1001130166
1000995296
schedule21 Jul 24 person by visibility 842 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी दिवसभर पावसाची संततधार कायम राहिली. कोल्हापूर शहर परिसरालाही पावसाने झोडपून काढले. शहरातील सखल भागात तळयाचे स्वरुप आले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्डयातून वाट काढताना वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरण ८० टक्के भरले आहे. धरणातून १४५० क्युसेक विसर्ग होत आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे ३७ फूट ९ इंचावर पोहोचली आहे. इशारा पातळी ३९ फुटाला आहे. दरम्यान जिल्हयाच्या विविध भागात झालेल्या घरांच्या पडझडमुळे नऊ साधारणपणे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
 पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरातसाठ इंचाने वाढ झाली. पाणी संथगतीने वाढत असले तरी नदीकाठच्या गावात धाकधूक वाढत आहे. प्रशासनाने, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. नदीकाठावरील वस्तीमध्ये स्थलांतराच्या तयारीत आहेत. कोल्हापूरसह राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, करवीर, चंदगड, गगनबावडा तालुक्यात दिवसभर पाऊस होता. पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, वारणा, धामणी, कुंभी या नद्या पात्राबाहेर पडल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ८५ बंधारे पाण्याखाली आहेत. सकाळी दहा वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७ फूट इतकी होती. रात्री आठ वाजता ३७ फूट ९ इंचापर्यंत पाणी पातळी वाढली होती. दहा तासात ९ इंच पाणी वाढले.
हातकणंगले तालुक्यात वारणा नदीवरील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलावर पाणी आल्याने पुलावरील वाहतूक थांबविली आहे. प्रशासनाने दोन्ही बाजूला बॅरिकेटस लावून मार्ग वाहतुकीला बंद केला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ संथअसली तरी ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. शिरढोण-कुरुंदवाड दरम्यानच्या नदीवरील पुलावर पाणी आले. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खोकुर्ले आणि मांडुकली या ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. कुंभी नदीवरील गोठे येथील पूलही पाण्याखाली गेला आहे.