गर्दीच्या ठिकाणी-पर्यटनस्थळी शौचालय उभारणार ! कृष्णराज महाडिकांची परिवहनमंत्र्यासोबत चर्चा !!
schedule26 Nov 25 person by visibility 9 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी, महामार्गावर किंवा गर्दीच्या ठिकाणी शौचालयं नसल्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होते. विशेषत: महिला वर्गाची मोठी कुचंबणा होते. ही बाब लक्षात घेवून यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी गर्दीच्या ठिकाणी शौचालयं बांधण्यासंदर्भात वुलू कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार कंपनीमार्फत राज्यभरात शौचालयांची निर्मिती केली जाणार आहे. दरम्यान याबाबत महाडिक यांनी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबईत भेट घेतली आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली.
राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी तसंच गर्दीच्या स्थळांवर नागरिकांसाठी शौचालयं बांधून त्यांची सोय करण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नियोजन केले आहे. देशभर गर्दीच्या ठिकाणी शौचालयं उभा करणार्या प्रसिध्द वुलू कंपनीसोबत महाडिक यांनी जून महिन्यात करारही केला आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून कृष्णराज महाडिक यांनी राज्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांच्यासोबत बैठक घेतली.
मुंबईतील मंत्रालयात झालेल्या बैठकीत महाडिक यांनी, राज्यात ठिकठिकाणी शौचालयांची आवश्यकता विषद करून त्याबाबत वुलू कंपनीशी झालेल्या कराराचीही माहिती दिली. दरम्यान राज्यभरातील बस स्थानकांवर महामंडळाच्यावतीने शौचालयं बांधली जाणार आहेत. त्यासोबतच अन्य गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळे, महामार्ग या ठिकाणीही शौचालयं बांधण्यासंदर्भात मंत्री सरनाईक यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या उपक्रमाला सुरवात होईल, अशी माहिती महाडिक यांनी दिली.