मतदार यादीतील हरकतीसाठी मुदतवाढ द्या : शिवसेनेची मागणी
schedule25 Nov 25 person by visibility 20 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :‘ महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये प्रचंड चुका आहेत. सर्व याद्या तपासूनच अंतिम यादी जाहीर करावी. तसेच हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढ मिळावी. हरकतीसंबंधी योग्य निर्णय घ्यावा.’ अशी मागणी शिवसेनेने केली. स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन निवदेन दिले. तसेच सामूहिक स्वरुपातील तक्रारी स्विकाराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. मतदार यादीतील घोळामध्ये नागरिक गोंधळले आहेत. बहुतांश सर्वच प्रभागातील मतदार याद्यामध्ये चुका आढळत आहेत. या चुका दुरुस्त झाल्या पाहिजेत. अधिकारी व बीएलओंना स्पष्ट सूचना देऊन मतदार यादी दुरुस्त करावी असे त्यांनी म्हटले आहे. शिष्टमंडळात माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, रमेश पोवार, संभाजी जाधव, रशीद बारगीर, संगीता सावंत, रामदास भाले, अभिजीत चव्हाण, सुनंदा मोहिते, आनंदराव खेडकर,आशपाक आजरेकर, प्रविण लिमकर, इस्माइल बागवान, सुशांत पोवार, विश्वविक्रम कांबळे यांचा समावेश होता. मतदार यादीतील घोळप्रश्नी शिवसेनेतर्फे महापालिका प्रशासनाला निवेदन दिले.