ऋतुराज पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नगरसेवक भेटले प्रशासकांना
schedule25 Nov 25 person by visibility 26 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मतदार यादीतील घोळ तत्काळ दूर करावा या मागणीसाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. एकाच कुटुंबांतील नावे वेगवेगळया प्रभागात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. मतदार यादी पाहण्यासाठी महापालिकेने उपलब्ध केलेली मोबाइल फ्रेंडली लिंक नाही. मतदार यादीमधील घोळ दूर करण्यासाठी प्रत्येक प्रभागात एक अधिकारी नेमा. काही बीएलओंनी राजकीय दबावातून काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी दौलत देसाई, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, प्रतापसिंह जाधव, माणिक मंडलिक, दुर्वास कदम, इंद्रजीत बोंद्रे, भूपाल शेटे यांनी मतदार यादीतील चुका मांडल्या. शिष्टमंडळात माजी नगरसेविका भारती पोवार, संजय मोहिते, विक्रम जरग, विजय सुर्यवंशी, सुभाष बुचडे, मोहन सालपे, अर्जुन माने, धनजंय सावंत, रविंद्र आवळे, काका पाटील, सुरेश ढोणुक्षे, जय पटकारे, विनायक फाळके, राजेंद्र साबळे, शिवानंद बनछोडे, रियाज सुभेदार, विनायक कारंडे, अनुप पाटील आदींचा समावेश होता. तत्पूर्वी अजिंक्यतारा कार्यालयात काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची बैठक झाली.