प्रतिष्ठानच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
schedule25 Nov 25 person by visibility 64 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नव महाराष्ट्राचे शिल्पकार व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोल्हापूरच्यावतीने अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद आवारात उभारलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक पोवार, सेक्रेटरी रमेश मोरे यांनी स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, सुनिल देसाई, चंद्रकांत वाकळे, संजय शिंदे, संतोष मेघाणे, महादेव पाटील, गौरव पनोरे, रमेश पोवार, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी राजाराम कांबळे आदी उपस्थित होते.