Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळतर्फे संचालक चेतन नरके यांचा सत्कारआगामी काळात लष्करामध्ये महिलाराज : कर्नल हेमंत जोशी  प्रतिष्ठानच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन१५९ स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मर्यादेचे उल्लंघन, २८ नोव्हेंबरला पुन्हा सुनावणीही मॅन धर्मेंद्र यांचे कलापूरशी नाते, कोल्हापुरी पाहुणचाराने भारावले होतेऋतुराज पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नगरसेवक भेटले प्रशासकांनामतदार यादीतील हरकतीसाठी मुदतवाढ द्या : शिवसेनेची मागणीशिवसेना ठाकरे गटाने घेतली प्रशासकांची भेटमतदार यादीतील चुका दुरुस्त करा, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मागणीटीईटी पेपर फुटी प्रकरणात प्राध्यापकाचाही सहभाग

जाहिरात

 

गोकुळतर्फे संचालक चेतन नरके यांचा सत्कार

schedule25 Nov 25 person by visibility 26 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांची भारतातील डेअरी उद्योगाची अग्रगण्य शिखर संस्था असणाऱ्या इंडियन डेअरी असोसिएशन(आयडीए) नवी दिल्‍लीच्‍या संचालकपदी सलग दुसऱ्यांदा महाराष्‍ट्रातून निवड झाल्याबद्दल त्‍यांचा सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ  यांचे हस्‍ते नरके यांचा सत्कार झाला. गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे हा कार्यक्रम झाला.

           चेअरमन मुश्रीफ म्हणाले, ‘डॉ. चेतन नरके हे प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी असून एक युवा, कार्यक्षम व नवनवीन उपक्रम राबवणारे संचालक म्हणून त्यांची ओळख आहे. एक शेतकरी दूध उत्पादक या स्तरावरून देशातील सर्वोच्च डेअरी उद्योगाची संस्था असणाऱ्या इंडियन डेअरी असोसिएशनसंस्थेच्या संचालकपदी पोहोचणे हे गोकुळ संघासाठी अभिमानास्पद आहे.यापूर्वी गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी आय.डी.ए चे चेअरमन म्हणून उल्लेखनीय कार्यभार सांभाळला होता. त्यांचे चिरंजीव डॉ. चेतन नरके यांनीही तीच परंपरा पुढे चालवत, गोकुळतर्फे राज्यातील व जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी पुन्हा मिळवली आहे.’

नरके म्हणाले की,“गोकुळ दूध संघाच्या आणि आयडीएच्या माध्यमातून राज्य व जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी, तसेच दुग्धव्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करत राहणार आहे. याप्रसंगी संचालक विश्वास पाटील, अरूण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे,अजित नरके,किसन चौगले, रणजीतसिंह पाटील,कर्णसिंह गायकवाड,संभाजी पाटील, प्रकाश पाटील,अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर,शौमिका महाडिक, युवराज पाटील,राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,बोर्ड सेक्रटरी प्रदीप पाटील  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes