Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डीवाय पाटील विद्यापीठाचे तीन प्राध्यापक ठरले यंग असोसिएट-फेलोविवेकानंद कॉलेजमध्ये मंगळवारी शिष्यवृत्ती वितरण समारंभमुश्रीफ, आबिटकरांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक, अंबाबाई दर्शन  अन् विकासाची ग्वाहीदोन्ही मंत्र्यांची गोकुळचे चेअरमन डोंगळेंच्या घरी सदिच्छा भेट, कुटुंबियांकडून  सत्कारराजेश क्षीरसागरांच्या अजेंडयावर शहरासाठी टॉपची वीस विकासकामे ! दोन वर्षानंतर मंत्रीपदही मिळणार !!जिल्ह्यातील चाळीस ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसएसपींची कडक अॅक्शन, लाचप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह तिघे निलंबितमहिला आयोग आपल्या दारी, अध्यक्षांनी केले प्रशासनाचे कौतुकएक जानेवारीपासून सातारा-कोल्हापूर डेमू धावणार नव्या वेळेनुसारकोल्हापुरात शनिवारी-रविवारी मैत्रीण महोत्सव

जाहिरात

 

राहुल गांधींचा आजचा दौरा स्थगित, शनिवारी कोल्हापुरात येणार

schedule04 Oct 24 person by visibility 509 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजीचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. राहुल गांधी आता शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता कोल्हापुरात येणार आहेत. दरम्यान गांधी यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी कसबा बावडा येथील भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळाचे अनावरण होणार होते मात्र त्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे पुतळा अनावरणाचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला आहे. गांधी यांच्या हस्ते शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती काँग्रेसचे विधान परिषदेमधील गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी दिली.
 गांधी यांच्या दोन दिवशीय कोल्हापूर दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. शुक्रवारी सायंकाळी कसबा बावडा येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी सगळी तयारी पूर्ण झाली होती. सारा परिसर आकर्षक पद्धतीने सजवला होता. पानाफुलांनी सुशोभीत केला होता. विद्युत रोषनाई केली होते. या कार्यक्रमासाठी शिवभक्त व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम , खासदार शाहू महाराज, युवराज मालोजीराजे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, माजी खासदार  जयवंतराव आवळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या सह जिल्ह्यातील काँग्रेसचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी भगवा चौक येथे मोठ्या संख्येने जमले होते. माणसांच्या गर्दीने चौक फुलला होता. साऱ्यांना गांधी यांच्या आगमनाची आतुरता लागून राहिली होते. गांधी यांच्या स्वागताची सुरू असताना साधारणपणे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गांधी यांचा दौरा रद्द झाल्याची वार्ता आली.
 काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी, उपस्थित लोकांना गांधी यांचा शुक्रवारचा दौरा रद्द झाल्याची माहिती दिली. राहुल गांधी हे कोल्हापूरला निघण्यासाठी दिल्ली विमानतळावर पोहचले होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. राहुल गांधी शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी, सकाळी नऊ वाजता येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी  दहा वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होईल असे आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच गांधी यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी हॉटेल सयाजी येथे संविधान सन्मान संमेलन होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes