छायाचित्रकारांच्या नजरेतून गावाकडची गोष्ट
schedule30 Jan 26 person by visibility 7 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील खेडे येथील छायाचित्रकार विलास दादू तोळसणकर यांच्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन ३० जानेवारी ते पाच फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शाहू स्मारक भवन येथील कलादालन येथे भरविले आहे. युवराज मालोजीराजे छत्रपती, उद्योजक धनंजय पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. शाश्वत फाऊंडेशनने पुढाकार घेऊन या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात साठहून अधिक छायाचित्रे आहेत. ग्रामजीवनाचे दर्शन घडविणारे हे अनोखे प्रदर्शन साऱ्यांनी पाहावे असे आवाहन संयोजक प्रभाकर पाटील, सागर बकरे, किशोर शहा, मिलिंद पाटील, सचिन करमाळे, सुभाष पाटील यांनी केले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे