करवीर निवासिनी गृहतारण सहकारी संस्थेचे उद्घाटन, सभासदांच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल- जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे
schedule28 Jan 26 person by visibility 25 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर निवासिनी गृहतारण सहकारी संस्थेचा उद्घाटन समारंभ दिमाखात पार पडला. जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षक संघाचे राज्य नेते राजाराम वरुटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासगी शिक्षक संघटनेचे नेते भरत रसाळे हे प्रमुख पाहुणे होते. संस्थेचे कार्यालय शनिवार पेठ येथे आहे.
याप्रसंगी बोलताना जिल्हा उपनिबंधक करे म्हणाले, ‘शिक्षकांच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम शिक्षक संस्थानी केले आहे. त्याचे उदाहरणं मी स्वतः आहे. शिवाय सभासदांच्या नवीन घराचे स्वप्न या गृहतारन संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होईल.’याप्रसंगी शिक्षक संघाचे राज्य नेते वरुटे यांनी, ‘करवीर निवासिनी गृहतारण सहकारी संस्था लौकिकाची नवी उंची गाठेल.’असे सांगितले. संस्थेचे मुख्यप्रवर्तक व चेअरमन प्रशांत पोतदार यांनी संस्था स्थापनेमागील उद्देश गरज आणि भावी वाटचालीवर प्रकाश टाकला. सेवानिवृत्त शिक्षक, त्यांचे कुटुंबीय, कार्यरत शिक्षक त्यांचे नातेवाईक, सक्षम सभासदांना आर्थिक स्थिरता, घराचे, व्यवसायचे स्वप्न पूर्ण करता यावे यासाठी संस्था कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भरत रसाळे यांनी, संस्थेला भरभक्कम आधार देणारी ठेव देत असल्याची घोषणा केली. शिक्षक संघांचे राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बबन केकरे यांनी संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राजमोहन पाटील, साहेब शेख, मनोज माळवदकर, जिल्हा परिषद सोसायटी चेअरमन श्रीकांत चव्हाण, अशोक संकपाळ, बाजीराव लगारे, शंकर भोई, राजाराम शिर्के, आनंदा बेडेकर बाजीराव पाटील, के.एल.खाडे, बी.डी.चौगुले, सर्जेराव सुतार, श्वेता खांडेकर, संजय ठाणेकर, प्रताप राबाडे, बाबा साळोखे, प्रकाश पाटील, श्रीपती तेली, शशी पाटील आनंदा सुतार, दत्तात्रय एकशिंगे, नूरजहाँ मुलानी, संपदा बागी, आर. डी. कांबळे, बाबासाहेब पाटील, बबलू वडर,बाबासाहेब पाटील उपस्थित होते. संस्थेचे व्हाइस चेअरमन बाजीराव कांबळे यांनी स्वागत केले. संस्थेचे संचालक सातापा चौगुले यांनी आभार मानले.