वारसा आबाजींचा…वसा समाजकार्याचा !
schedule29 Jan 26 person by visibility 25 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जवळपास चार दशकाहून अधिक काळ समाजकारण, सहकार, दुग्ध व्यवसाय आणि राजकारणात सक्रिय असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील. ग्रामपंचायत, पंचायत समिती, कारखानदारी, दूध संघाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातील लोकांची उन्नती हा विचार त्यांच्या केंद्रस्थानी. ते, आबाजी या नावांनी सर्वपरिचित. त्यांच्याच समाजकार्याचा, सहकाराचा वारसा घेऊन चिरंजीव सचिन पाटील हे काम करत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते पाडळी खुर्द या मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढत आहेत.
सचिन पाटील हे, शिरोली दुमालाचे हे लोकनियुक्त सरपंच आहेत. स्थानिक स्वराज्य पातळीवर ग्रामस्तरावर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांना लोकांच्या आशा, आकांक्षांची जाणीव आहे. सरपंच म्हणून त्यांनी गावात पायाभूत सुविधांची उपलब्धता केला. सामाजिक कार्याला पाठबळ दिले. विविध प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देण्याची भूमिका अंगिकारली. यामुळे हा तरुण चेहरा लोकांच्या पसंतीस उतरला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. शिवसेनेने त्यांच्यातील संघटन कौशल्य, ग्रामीण भागात काम करण्याची वृत्ती, साऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका हे पाहून त्यांना उमेदवारी दिली आहे.
गोकुळ दूध संघ, कारखानदारी, ग्रामपंचायती आणि गावपातळीवरील सहकारी संस्थांच्या माध्यमातून पाटील कुटुंबीय हे गेली अनेक दशके जनमानसात काम करत आहे. गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील हे या पंचक्रोशीतील समाजजीववनाशी समरस झालेले व्यक्तिमत्व. लोकांच्या सुखदुखात सहभागी होणारा, अडअडचणीच्या काळात पाठीशी ठाम उभा राहणारा वडिलधारी माणूस म्हणून त्यांना आदराचे स्थान. आबाजी यांनी ज्या ज्या संस्थेत काम केले, तेथे त्यांनी लोकांच्या हिताच्या कारभाराला प्राधान्य दिले. पदावरुन काम करताना विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविल्या.
आता आबाजींची पुढील पिढी समाजकारण, सहकार, राजकारणात सक्रिय झाली आहे. उमेदवार सचिन पाटील यांचा पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावांशी त्यांचा संपर्क आहे. शिरोली दुमालाचे सरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आसपासच्या गावातही विविध सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचिण्याचा त्यांचा मानस आहे. जे लोकांना अपेक्षित आहे, त्या पद्धतीने काम करत साऱ्यांना विकासाच्या प्रवाहात सामील करुन घेऊ ही त्यांची भूमिका लोकांना पटत आहे.