प्रा.जयसिंग सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार ! शंकरराव घाटगे शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शुक्रवारी संस्कारसोहळा कार्यक्रम !!
schedule29 Jan 26 person by visibility 43 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील कै.शंकरराव घाटगे शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार व्याख्याते प्रा.जयसिंगराव सावंत यांना जाहीर झाला आहे. संस्था संचलित सौ. वृंदा घाटगे प्री-प्रायमरी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व गौरव सोहळा असा संयुक्त कार्यक्रम शुक्रवारी, ३० जानेवारी २०२६ रोजी डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे दुपारी २.३० वाजता आयोजित केला आहे.
याप्रसंगी नूतन नगरसेविका सुषमा संतोष जरग, प्रशांत जरग, श्रीमती विमल गवळी, गोविंद कुलकर्णी, आय.जी. फुटाणे व एस. एम. बागेवाडी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी संत साहित्याचे अभ्यासक प्रा. शिवाजीराव भुकेले हे प्रमुख वक्ते आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे ‘संस्कारसोहळा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर आहे. नृत्य, गीत, नाट्य व संस्कारमूल्यांवर आधारित सादरीकरणे हे या स्नेहसंमेलनाचे खास आकर्षण असणार आहे.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व पालकांच्या सहकार्याने या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. या सोहळ्यास केंद्रप्रमुख नीता ठोंबरे, बेळगावचे उद्योगपती कलगोंडा पाटील, रावसाहेब मुरगी, बाजीराव माणगावे, शिवाजी पाटील, सागर पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेतर्फे पी.एस.घाटगे व वृंदा घाटगे यांनी आवाहन केले आहे.