जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस लांबणीवर
schedule29 Jan 26 person by visibility 136 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस लांबणीवर पडल्या. पाच फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होणार होते. आता नव्या वेळापत्रकानुसार सात फेब्रुवारी रोजी मतदान आणि नऊ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. राज्य सरकारने राज्यात तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलल्या आहेत. निवडणूक आयोगाने यापूर्वी पाच फेब्रुवारीला मतदान आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी असा कार्यक्रम जाहीर केला होता. आता सात फेब्रुवारी रोजी मतदान होईल आणि नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सात फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.