केआयटीमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा
schedule29 Jan 26 person by visibility 25 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयामध्ये देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून भारतीय नौसेनेतील अधिकारी व केआयटीच्या माजी विद्यार्थिनी सब लेफ्टनंट ईशा शहा उपस्थित होत्या.
शहा यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय संरक्षण दल आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज होत असताना आत्मनिर्भर भारताचे स्वप्न संरक्षण दलामध्ये प्रत्यक्षात येत आहे असा अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला. स्वयंशिस्त व सर्वोत्तम काम ही आपली सवय झाली तरच आपण यशस्वी होऊ शकतो असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. संरक्षण दलामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना मोठ्या संधी उपलब्ध आहेत त्याचा त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी संस्थेच्यावतीने प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील २८ विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या शाहू माने,विश्व तांबे,सानिया सापळे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये निवड झालेल्या प्रथम वर्षातील अनुप पाटील,सिद्धराज भोसले विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकांसह करण्यात आला.
केआयटी एन.सी.सी युनिटच्या विद्यार्थ्यांनी युद्धाचे प्रात्यक्षिक सादर केले. एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी ‘रील्स व रिअल’ या विषयावरील समाज प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, रजिस्ट्रार डॉ.दत्तात्रय जे.साठे त उपस्थित होते. एनसीसीच्या स्वरदा नाईक यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. संजना गजरे यांनी एनसीसी युनिटची माहिती उपस्थितांना दिली. प्रा.तृप्ती गुणे यांनी सूत्रसंचालन केले.