कसबा बीडमध्ये शिवसेनेची जंगी सभा, पाडळी खुर्द मतदारसंघात भगवे वातावरण
schedule30 Jan 26 person by visibility 82 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सचिन विश्वास पाटील यांच्या प्रचारार्थ कसबा बीड येथे जंगी सभा झाली. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेने मतदारसंघात भगवे वातावरण निर्माण केले. नागरिकांच्या प्रचंड गर्दीन झालेल्या या सभेत आमदार नरके यांनी, ‘मतदारसंघातील विकासकामांना आणखी गती देण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भगवा फडकवू याा्र’ असे आवाहन केले. गजानन सहकार समूहाचे संस्थापक सुरेश सुर्यवंशी हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
या सभेत बोलताना आमदार पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा ऊहापोह केला. ते म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघात कोटयवधी रुपयांची विकास कामे केली. आरोग्य सुविधा मिळवून दिल्या. लाडकी बहिण योजना महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम बनवित आहे. विकासकामांचा हा आलेख आणखी उंचाविण्यासाठी जिल्हा परिषद मतदारसंघ व पंचायत समितीवर भगवा फडकवू या असे आवाहन केले. जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सचिन पाटील यांनी, ‘मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास साधण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. समाजकारण, राजकारणाच्या माध्यमातून लोकांचा विकास साधण्यावर भर आहे. जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावाला विकासात्मक चेहरा प्राप्त करुन देऊ.’
याप्रसंगी सुरेश सुर्यवंशी, गोकुळचे संचालक अजित नरके, पृथ्वीराज सुर्यवंशी, महिला आघाडीच्या सुधा पाटील यांची भाषणे झाली. या सभेत शेळकेवाडी येथील किरण शेळके, मानसिंग शेळके, संजय शेळके, चंदर शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सभेला गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, कुंभी कासारी कारखान्याचे तज्ज्ञ संचालक भगवान रामा पाटील, आनंदराव पाटील, विश्वास दत्तात्रय पाटील, सरदार पाटील, उत्तमराव वरुटे, कुंभी बँकेचे संचालक रणजीत पाटील, पंडित वरुटे, राजवीर नरके, अमित वरुटे, बुद्धिराज पाटील आदी उपस्थित होते.