+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही हे शाहू महाराजांनी दाखवून दिले-कपिल पाटील adjust आमदार प्रकाश आवाडे निवडणूक लढवणार, हातकणंगलेत अपक्ष उमेदवारी adjustगोकुळमार्फत सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा adjustशिक्षक बँकेतील राजकारणाचे कवित्व ! एकमेकांच्या कामकाजाचा पर्दाफाश ! adjustगोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री adjustरोटरी गार्गीजतर्फे सोळा एप्रिलला भरतनाट्यम कार्यक्रम adjustसभेच्या मान्यतेने अमृत संजीवनी योजना, विक्रमी नफ्यामुळे विरोधकांना पोटशूळ- अध्यक्ष राजेंद्र पाटील adjustनिवडणुकीचा मांडव आपल्या दारात; तिन्ही गटांचा समन्वय ठेवा-हसन मुश्रीफ adjustशक्तिपीठ महामार्ग धनदांडग्यासाठी, शेतकऱ्यांची बैलगाडी त्यावर धावणार का ? - संजय घाटगे adjustटेंबलाईवाडी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार - जिल्हाधिकारीसो अमोल येडगे
Screenshot_20240226_195247~2
schedule02 Apr 24 person by visibility 78 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रा. संजय मंडलिक, हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांनी मंगळवारी (दोन एप्रिल) जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांची भेट घेतली. राज्याच्या राजकारणात कोरे हे भारतीय जनता पक्षासोबत आहेत. कोरे यांची कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात ताकत आहे. या निवडणुकीत त्यांची मदत लाभावी म्हणून खासदार मंडलिक व माने यांनी त्यांची भेट घेतली.
कोरे हे शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करतात. हातकणंगले, गगनबावडा, गडहिंग्लज, करवीर या भागातही जनसुराज्य शक्तीचे नेटवर्क आहे. जिल्हा परिषद, बाजार समिती, जिल्हा बँक, शेतकरी संघ अशा विविध सहकारी संस्थेतही जनसुराज्यची लक्षणीय ताकत आहे. वीस वर्षापूर्वी त्यांनी कोल्हापूर महापालिकेतही सत्ता आणली होती. कोरे यांना मानणारा वर्ग आहे. त्यांच्या ताकतीचा फायदा निवडणुकीत व्हावा म्हणून महायुतीच्या उमेदवारांनी वारणानगर येथे भेट घेतली. या भेटीत कोरे यांनी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जनसुराज्यचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी होतील. महायुतीच्या उमेदवारांसाठी ठिकठिकाणी मेळावू घेऊ असेही त्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश पाटील, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदूरकर, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, नितीन पाटील आदी उपस्थित होते.