+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule26 Aug 22 person by visibility 295 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागमार्फत राबविल्या जाणा-या वैयक्तिक व सामूहिक योजनांच्या साहित्याची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शुक्रवारी यासंबंधी सूचना केल्या.
समाजकल्याण समितीच्या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी समाजकल्याणमार्फत गावोगावी राबविण्यात आलेल्या वैयक्तिक व सामूहिक योजनांची जिल्हा परिषदच्य वेगवेगळया यंत्रणेमार्फत तपासणी करावी. लाभार्थीनी साहित्य खरेदी करुन वापरात ठेवले आहे का ? तसेच सामूहिक योजनेअंतर्गत संबंधित काम समाजकल्याण
विभागाने नेमूण दिलेल्या वस्तीतच झाले आहे का? तसेच त्याचा दर्जा कसा आहे याबाबत तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
या कामामध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या अवघड क्षेत्रातील शाळेमधील मागासवर्गीय विद्यार्थी /विद्यार्थीनींना सायकलसाठी दहा लाख रुपयांच्या रकमेची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्याची छाननी करावी व सायकल कंपनीशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना मजबूत व टिकाऊ सायकल बाबतच्या दराबाबत निश्चिती करावी.
दिव्यांग शाळेच्या कार्यशाळेमध्ये कागदी लगद्यापासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती, गौरी मुखवटे, बैल याबरोबरच इतर खेळणी बनविणेसाठी लागणारे यंत्र तसेच शिलाई मशिन, लॅमिनेशन मशिन, ट्रॅम्पोलीन स्पायरल बाईंडींग मशिन, मेणबत्ती बणविण्याचे मशिन, पक्षांची घरटी बणविण्यासाठी लागणारे साहित्य २०२२-२३ मधील तरतूदीमधून पुरविण्यात यावे असेही बैठकीत ठरले. समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांची उपस्थिती होती.