+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule23 Jul 24 person by visibility 110 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. सत्ताधारी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेते मंडळींनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले. विरोधी काँग्रेस व अन्य पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्पावरुन सरकारवर निशाणा साधला आहे.
............................
पायाभूत सुविधावर भर देणारा अर्थसंकल्प
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करणारा आहे. शेती सुधारणा, नैसर्गिक शेतीला चालना, शिक्षणासाठी विद्यार्थ्याना संधी, महिलांचा सहभाग वाढविण्याबरोबरच सर्व सामान्यांसाठी असणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला पाच वर्षाची मुदतवाढ दिली आहे. वर्षाला तीन घरगुती सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय हा अतिशय चांगला असून सामान्यांना दिलासा देणारा आहे. मुद्रा लोनची मर्यादा दहा लाखाहून वीस लाख करुन तरुणांना उद्योगाकडे वळविणे व स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला आहे. हा अर्थसंकल्प सर्वछा स्तरातील नागरिकांचे राहणीमान सुधारणारा आहे. ”
……………………………..
देशाला महासत्ता बनविण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक म्हणाले, “ आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या संकल्पनेला वेगाने मूर्त स्वरूप देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प महत्वाचा आहे. शेतकरी, महिला, नोकरदार, युवक, उद्योजक आणि गोरगरीबांच्या अपेक्षांचा आणि गरजांचा विचार करून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी हा परिपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटी रूपयांची तरतुद म्हणजे देशाच्या विकासाचा भक्कम पाया आहे. तर शेतकर्‍यांनाही या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. रोजगार, कौशल्य विकास, शिक्षण, शहरीविकास, गरीबांसाठी घरकुल, महिला सक्षमीकरण, अल्पसंख्यांक मागास घटकांचा विकास अशा सर्व मुद्दयांचा समावेश असलेला मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प देशाला महासत्ता बनवण्याच्या वाटेवर नेणारा आहे.”
………………………….
प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला चालना देणारा आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, विद्यार्थी, तरुण यासह अनेक क्षेत्रासाठी महत्वाच्या योजनेद्वारे आर्थिक तरतूद केली आहे. समाजाच्या प्रत्येक वर्गाला आर्थिक ताकत देणारा हा अर्थसंकल्प आहे. देशात नवीन उद्योजक घडावेत यासाठी हमीशिवाय मुद्रा कर्जाची मर्यादा दहा लाखावरुन वीस लाख केली आहे.यामुळे छोटया व्यावसायिकांना, विशेषत: महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळणार आहे. यासह दलित, मागासवर्गाला सशक्त करण्याच्या योजना अर्थसंकल्पात आहेत. छोटे व्यापारी, लघु उद्योग यांच्या प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध करणारा अर्थसंकल्प आहे.”
…………………
खोटे आश्वासन देणारे लॉलिपॉप बजेट
काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील म्हणाले, “देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरतो. या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्रातील नेतृत्व महाराष्ट्राचा इतका राग का करते ? हे कळत नाही.बिहार व आंध्रप्रदेशसाठी जाहीर केलेल्या योजना पाहता हा अर्थसंकल्प या दोन राज्यासाठीच मांडला असल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीत तरुणांनी हिसका दाखविल्यानंतर रोजगाराच्या संधीचा खोटा आभास तयार करणारे बजेट मांडले आहे. या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने बेरोजगारांना खोटी आश्वासने तर दिलीच पण सर्वसामान्य घटकांनाही लॉलिपॉप दाखविले आहे.एनडीएमध्ये मुख्मंत्री एकनाथ शिंदे सहभागी असतानाही महाराष्ट्रात एकही प्रकल्प त्यांना आणता आला नाही.येत्या निवडणुकीत जनता सत्ताधाऱ्यांना योग्य उत्तर देईल.”
………………….
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा निराशजनक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, “केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा निराशजनक आहे. कृषी क्षेत्रात डिजीटल प्लॅटफॉर्म करण्यापेक्षा पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. एकींकडे तेलबिया व डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णतेवर भर द्यायचा व परदेशातून तेलबिया, डाळी आयात करायचे यामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. सरकारने शेती क्षेत्रास भरींव तरतूद करणार असल्याचा डांगोरा पिटवला मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. सरकारने शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केले तर जवळपास १५० कोटी जनतेला दोन वेळ पुरेल एवढे अन्नधान्य पिकवणारा शेतकरी शेती क्षेत्रातून बाहेर पडून लागला तर या खंडप्राय देशासाठी ते शोभादायक नाही.”
……………………….
अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटयाला काही मिळाले नाही
कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा नाही. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात केवळ दोन राज्यांना विशेष सवलती दिल्या आहेत. तर महाराष्ट्रकडे दुर्लक्ष करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप खासदारांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळत आहे.”