Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

बांधकाम विषयक दालन प्रदर्शनास प्रारंभ, १७० हून अधिक स्टॉल !

schedule30 Jan 26 person by visibility 36 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बांधकाम विषयक सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध करुन देणाऱ्या ‘दालन २०२६’ प्रदर्शनास शुक्रवारी (३० जानेवारी) प्रारंभ झाला. महासैनिक दरबार हॉल येथे भरविण्यात आलेल्या या चार दिवसीय प्रदर्शनामध्ये २००  हून अधिक स्टॉल आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील वास्तू विषयक सर्वात मोठे प्रदर्शन म्हणून दालनची ओळख आहे. क्रीडाई कोल्हापूरतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, दालनचे चेअरमन महेश यादव, क्रीडाईचे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सचिव गणेश सावंत, संग्राम दळवी, क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, राजीव परीख ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक श्रीनिवास गायकवाड, कृष्णा पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फीत कापून उद्घाटन झाले. क्रीडाईचे पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी क्रीडाई कोल्हापूरतर्फे स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ‘दालन २०२६’चे प्रदर्शन साधेपणाने करण्यात आले. दालन प्रदर्शन हे ३० जानेवारी ते दोन फेब्रुवारी २०२६ या कालावधीत खुले आहे.

दालन प्रदर्शनात शहर आणि परिसरातील विविध गृहप्रकल्प, व्यापारी संकुल, ऑफिसेस यासंबंधीची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. तसेच बांधकाम साहित्यविषयक स्टॉल्स आहेत. वित्तीय संस्थाही ग्राहकांच्या सेवेत आहेत. या प्रदर्शनाच्या संदर्भात क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत व दालनचे चेअरमन महेश यादव यांनी ‘कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांनाही दालन २०२६ हे प्रदर्शन उपयुक्त ठरणारे आहे. कोल्हापुरात नवीन गृहप्रकल्प सुरू आहेत. कोल्हापूर विकासाच्या मार्गावर आहे. नागरिकांच्या गरजा ओळखून आणि भविष्यकालीन वेध घेत कोल्हापुरात गृहप्रकल्प, व्यापारी संकुल, ऑफिसेस उपलब्ध असणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी दालन प्रदर्शनाला भेट देऊन कोल्हापुरातील आपल्या घरांचे व कार्यालयाचे स्वप्न साकार करावे.’असे आवाहन केले आहे.

 प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडाईचे पदाधिकारी अजय डोईजड, नंदकिशोर पाटील, निखिल शहा, श्रीराम पाटील, सारंग नालंग, सचिन ओसवाल, गौतम परमार, प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, चेतन चव्हाण, संदीप पोवार, अमोल देशपांडे, श्रीकांत पाटील, अतुल पोवार, सुनिल चिले, मुक्तीक पाटील, संदीप बोरचाटे क्रीडाई महिला विंगच्या संगीता माणगावकर, शिल्पा कुलकर्णी, मोनिका बकरे,साक्षी बोरचाटे, बांधकाम व्यावसायिक अभिजीत मगदूम, गिरीश रायबागे, पारस ओसवाल, महेश पोवार, जयेश कदम, पवन जमादार, उदय निचिते, प्रतीक होसमनी,  क्रीडाई कोल्हापूर ऑफिसचे मॅनेजर वसंत पाटील आदी उपस्थित होते. सचिव गणेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes