Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भर पावसात शिक्षकेतर सेवकांचे आंदोलन ! सरकार कधी दखल घेणार ?डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना घाळी समाजभूषण पुरस्कारकोरे अभियांत्रिकीमध्ये डिजिटल फाऊंड्री कार्यशाळेत प्राध्यापकासह उद्योजकांचा सहभागराज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धेसाठी पियुष पाटीलची निवड पीएन गटाची नवी घोषणा –निष्ठा तीच अध्याय नवा ! सडोली खालसाच्या माळावरुन होणार नवीन राजकीय प्रवास !!गोकुळच्या विरोधात सर्किट बेंचमध्ये याचिका, २६ ऑगस्टला सुनावणीकरवीर तालुक्यातून गोकुळच्या संपर्क दौऱ्याची सुरुवात, सतेज पाटील, नाविद मुश्रीफ सहभागी ! विश्वास पाटील, अरुण डोंगळेची उपस्थिती !!डीवाय पाटील टेक्निकलचे चौदा विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतकोल्हापूरकरांची अभिमानाने फुललेली छाती, शाहूनगरीच्या प्रेमाने भारावलेले सरन्यायाधीश !  !कोल्हापूरचे सर्किट बेंच सामाजिक- आर्थिक न्यायाचा मैलाचा दगड ठरावा-सरन्यायाधीश भूषण गवई

जाहिरात

 

केंद्राच्या धोरणामुळे शेतकऱ्यांसह लहान ट्रॅक्टर मालकांवर आर्थिक संकट –सतेज पाटील

schedule10 Aug 25 person by visibility 90 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या नवीन मसुदा अधिसूचनेमुळे शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालकांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणे बसवण्याची सक्ती करणारा आहे. हा नियम म्हणजे शेतकऱ्यांवर लादलेला अनावश्यक तंत्रज्ञानाचा मोठा आर्थिक भुर्दंड असून त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे.

आमदार पाटील म्हणाले, दिल्लीत एसी कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी कायदे बनवणाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्याच्या व्यथा कळत नाहीत. आमचा बळीराजा शेतात राबतो, महामार्गावर व्यावसायिक वाहतूक करत नाही. त्याच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणे बसवण्याची सक्ती करणे हा थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा घालण्यासारखेच आहे. आधीच महागाई आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे पिचलेल्या शेतकऱ्याला हा खर्च परवडणारा नाही. सरकारने वास्तवाचे भान ठेवून ही जाचक अधिसूचना तात्काळ रद्द करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. सरकारने १८ ऑगस्ट २०२४ पर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत दिली असून आमदार सतेज पाटील यांनी शेतकरी, ट्रॅक्टर मालक व शेतकरी संघटनांना या जाचक नियमांविरोधात comments-morth@gov.in  ईमेलवर लेखी हरकती पाठवण्याचे आवाहन केले आहे. यावेळी आनंदराव पाटील -बडबडे, बाळासाहेब आळवेकर, पांडुरंग बिरंजे, विद्यानंद जामदार, विठ्ठल माळी, श्रीकांत उलपे, भगवान चौगले, सुरेश पाटील, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील राजू चव्हाण धनाजी गोडसे मोहन सालपे अजित पोवार उमाजी उलपे हिंदूराव ठोंबरे महादेव लांडगे तानाजी बिरंजे रमेश रणदिवे यांच्यासह सर्व संचालक, शेतकरी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes