करवीर तालुक्यातून गोकुळच्या संपर्क दौऱ्याची सुरुवात, सतेज पाटील, नाविद मुश्रीफ सहभागी ! विश्वास पाटील, अरुण डोंगळेची उपस्थिती !!
schedule18 Aug 25 person by visibility 63 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा सोमवारी झाली. आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपर्क सभा झाली.
आमदार सतेज पाटील म्हणाले,‘ गेल्या चार वर्षांत गोकुळने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची भूमिका घेतली असून म्हैशीसाठी रुपये १२ व गायीसाठी रुपये ६ इतकी दरवाढ केली तर म्हैस खरेदीसाठी ५० हजार पर्यंत अनुदान योजना सुरू केली आहे. करवीर तालुक्यातून गोकुळच्या संपर्क दौऱ्याची सुरुवात करताना मला आनंद होत आहे. या दौऱ्यातून शेतकरी व संस्थांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत.
चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या म्हैस दुधाला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे म्हैस दुधाच्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी संघाने जातिवंत म्हैस खरेदी अनुदान तसेच जातिवंत वासरू संगोपन अनुदानात वाढ केली आहे. गोकुळच्या सेवांचा प्रभावी वापर करून दूध उत्पादन वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले.
सभेत दूध संस्था प्रतिनिधी यांनी संस्था कर्मचारी प्रोत्साहन निधी मध्ये वाढ करावी, जातिवंत म्हैशीचे रेतन जास्तीत जास्त प्रमाणात संघाने उपलब्ध करून द्यावी तसेच सुक्या वैरणीच्या अनुदानात वाढ याविषयी चर्चा झाली. या चर्चेत शिवाजी देसाई (भामटे), प्रविण पाटील (कावणे), के.डी.पाटील (खुपिरे), नारायण पाटील (भामटे) यांनी चर्चेत भाग घेतला. संचालक बाबासाहेब चौगले यांनी स्वागत केले. संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी प्रास्ताविक केले. संचालक संभाजी पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले उपस्थित होते.