गोकुळच्या विरोधात सर्किट बेंचमध्ये याचिका, २६ ऑगस्टला सुनावणी
schedule18 Aug 25 person by visibility 265 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघाच्या कामकाजातील अनियमिततेवरुन कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. आजरा येथील महादेव प्राथमिक दूध संस्थांचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २६ ऑगस्ट २०२५ रोजी सुनावणी आहे. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, शर्मिला देशमुख यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. ‘गोकुळच्या कामकाजात अनियमितता आहे, मुंबई येथील जमीन खरेदी प्रकरणात नियमांना बगल दिली आहे. महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात घोटाळा झाला आहे. गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाला असून संचालकांवर वसुली निश्चित करावी. गोकुळ दूध संघाचे संचालक बरखास्त करुन प्रशासक नेमावा’अशी याचिका बेलवाडे यांनी दाखल केली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. गोकुळच्या लेखा परीक्षणात असंख्य त्रुटी आहेत. त्याकडे व्यवस्थापक व संचालक मंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे असा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.