+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule14 Jul 24 person by visibility 139 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राज्य सरकारकडून मराठा समाजासाठी सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर तो घटनाबाह्य व बेकायदेशीर असेल. आरक्षणात सगेसोयरेचा समावेश झाला ओबीसी आरक्षणावर घाला येईल. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी सगळे एकत्र येऊ घुसखोरीचा प्रयत्न झला तर जशास तसे उत्तर देऊ. ’अशा इशारा प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला.
ओबीसी जनमोर्चातर्फे शनिवारी, तेरा जुलै रोजी कोल्हापुरात ‘संविधानिक न्याय हक्क’सभा आयोजित केली होती. ओबीसी नेते,माजी आमदार प्रकाश शेंडगे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. अक्कमहादेवी मंटप येथे सभा झाली. प्रा. हाके म्हणाले, ‘प्रारंभी केवळ शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागत होते. आता ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करत आहेत. मनोज जरांगे यांच्या माध्यमातून दबावाचे राजकारण सुरू आहे. ओबीसींच्या आरक्षणला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर दिले जाईल.’
प्रकाश शेंडगे म्हणाले, ‘ओबीसी आरक्षणात घुसखोरीचा प्रकार सुरू आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी ओबीसीमधील सर्व घटकांनी एकवटले पाहिजे. रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार राहा. ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर ओबीसींच्या पुढच्या पिढीचे नुकसान होईल.’ याप्रसंगी अॅड. मंगेश ससाणे, नवनाथ वाघमारे, दीपक बोराडे यांनी मनोगते व्यक्त केली. या सभेपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अक्कमहादेवी मंटप अशी रॅली काढण्यात आली. तत्पूर्वी राजर्षी शाहू समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
दिगंबर लोहार यांनी स्वागत केले. ज्ञानेश्वर सुतार यांनी आभार मानले. यावेळी सुरेश कोरगावकर, सुनील गाताडे, एम. के. सुतार, बबन रानगे,उमा बनछाेडे, जयवंत वळंजू, प्रसाद वळंजू, दत्तात्रय लाड, नामदेव कुंभार, रामचंद्र सुर्यवंशी, पोपट ढवण, धनाजी गुरव, ज्योतिराम लोहार, वसंत वाठारकर, चंद्रकांत जंगम, दीपाली कुंभार, जान्हवी कानकेकर, पद्मावती ढवण, स्मिता वळंजू, इंदुमती हुंबरे आदी उपस्थित होते.