Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायमन्यू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निर्मल लोहिया, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर, नेमचंद संघवीशाहू स्मारक भवनमध्ये लोकराजांवरील चित्रमय प्रदर्शनसुनील कदम,शारंगधर देशमुखसह २५ नगरसेवक शिवसेनेत ! काँग्रेससोबत भाजप, राष्ट्रवादीलाही झटका !!शिरीष सप्रे प्रथम स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी पुस्तक प्रकाशन, सांगितीक कार्यक्रमकलाकार ओंकार भिसेच्या कुटुंबासाठी एकवटले संवेदनेचे हातमाहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी स्वीकारताना अटककोल्हापुरात राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, खेडकरांनी जिंकलीय पाच वेळा निवडणूकभाजप कोल्हापूरतर्फे श्यामाप्रसाद मुखर्जींना अभिवादन, आणीबाणीतील सत्याग्रहींचा सन्मानस्वतःच्या आवडीचे करिअर निवडा, यशस्वी भविष्य घडवता येते : रविंद्र खैरे

जाहिरात

 

कलाकार ओंकार भिसेच्या कुटुंबासाठी एकवटले संवेदनेचे हात

schedule24 Jun 25 person by visibility 256 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ढोलकीवादक ओंकार भिसे यांच्या कुंटुंबाच्या आर्थिक मदतीकरिता कोल्हापुरातील कलाकार, रसिकांनी  पुढे येऊन  संवेदनेचे भाव व्यक्त केले.ओंकार भिसे यांच्या कुटुंबीयांकडे  कलाकार सहाय्यता निधीचा तब्बल १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनच्या सर्व कलाकारांच्या वतीने एक शाम कलाकार के नाम हिंदी मराठी गाण्यांची  अभिवादनपर सांगितीक मैफल  झाली. शाहू स्मारक भवन मुख्य सभागृह येथे ही सांगीतिक मैफल आयोजित केली होती. कार्यक्रमासाठी सुप्रसिध्द गायक संगीतकार डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांनी प्रमुख उपस्थित राहून 'भावा बोल ना' या गाण्याद्वारे उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. यावेळी विक्रम पाटील, हणमंत चौगुले, सचिन देसाई, गणेश साळुंखे, दर्शन सुतार, विश्वनाथ चौगुले, कृष्णात माने, अभिजित लोखंडे हे वादक कलाकार तसेच सिध्दराज पाटील, सीमा सोनार, दिपकराज साळुंखे, सई लकडे, शफिक मुल्ला, आम्रपाली कुरणे, अभिषेक चव्हाण, रविराज सदाजय, प्रशांत शिराळे, सनी समुद्रे या गायकांनी भावस्पर्शी गाणी सादर केली  निवेदक प्रवीण बनसोडे यांच्या निवेदनाने रसिकांचे डोळे पाणावले. समाजातील दानशूर व्यक्तींनी मतदीचा हात द्यावा असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष गायक संगीतकार कबीर नाईकनवरे यांनी केले होते,या आवाहनाला प्रतिसाद देत रसिक श्रोत्यांनी भरभरून मदत केली. ढोलकीवादक ओंकार भिसे या तरुण कलाकाराचे नुकतेच अकाली निधन झाले. त्याच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्ता मुलगा गेल्याने संपूर्ण कुटुंब निराधार झाले आहे.या कुटुंबाच्या आर्थिक मदतीकरता सुप्रसिद्ध गायक कबीर नाईकनवरे प्रस्तुत 'अश्वघोष आर्ट अँड कल्चरल  फाउंडेशनच्या'वतीने एक शाम कलाकार के नाम हिंदी मराठी गाण्यांची 'सवाद्य अभिवादनपर सांगितीक कार्यक्रम झाला.यावेळी, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चेअरमन प्रा. आनंद भोजने, डॉ. प्रवीण कोडोलीकर, डॉ. कपिल राजहंस, डॉ. जगन कराडे, प्रा. एस. एस. महाजन, सतीश माळगे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes