Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायमन्यू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निर्मल लोहिया, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर, नेमचंद संघवीशाहू स्मारक भवनमध्ये लोकराजांवरील चित्रमय प्रदर्शनसुनील कदम,शारंगधर देशमुखसह २५ नगरसेवक शिवसेनेत ! काँग्रेससोबत भाजप, राष्ट्रवादीलाही झटका !!शिरीष सप्रे प्रथम स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी पुस्तक प्रकाशन, सांगितीक कार्यक्रमकलाकार ओंकार भिसेच्या कुटुंबासाठी एकवटले संवेदनेचे हातमाहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी स्वीकारताना अटककोल्हापुरात राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, खेडकरांनी जिंकलीय पाच वेळा निवडणूकभाजप कोल्हापूरतर्फे श्यामाप्रसाद मुखर्जींना अभिवादन, आणीबाणीतील सत्याग्रहींचा सन्मानस्वतःच्या आवडीचे करिअर निवडा, यशस्वी भविष्य घडवता येते : रविंद्र खैरे

जाहिरात

 

सुनील कदम,शारंगधर देशमुखसह २५ नगरसेवक शिवसेनेत ! काँग्रेससोबत भाजप, राष्ट्रवादीलाही झटका !!

schedule24 Jun 25 person by visibility 974 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माजी महापौर सुनील कदम, निलोफर आजरेकर, प्रतिभा नाईकनवरे यांच्यासह २५ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत मुक्तागिरी निवासस्थानी येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजित कदम, उद्याेजक सत्यजित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेसशी निगडीत आठ ते दहा नगरसेवक आहेत तर भाजपाशी निगडीत सात व राष्ट्रवादी अजित पवार गटाशी निगडीत दोन नगरसेवक आहेत. शिवसेनेत मोठया संख्येने नगरसेवकांचा प्रवेश हा जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना धक्का मानला जात आहे. मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील यांना धक्का देणारा प्रवेश शिवसेनेेने घडवून आणला. 

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी महापौर सुनील कदम, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, जहाँगीर पंडत, माजी नगरसेवक आनंदराव खेडकर, संभाजी जाधव,  भरत लोखंडे, अभिजीत चव्हाण, रशीद बारगीर, जहाँगीर पंडत, इस्माइल बागवान, नगरसेविका अनुराधा खेडकर, पूजा नाईकनवरे, रिना कांबळे, संगीता संजय सावंत,  अश्विनी बारामते, सुनंदा माोहिते,गीता गुरव यांचा समावेश आहे. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांचे समर्थक नगरसेवक अर्चना पागर, कविता वैभव माने, सीमा कदम यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. 

गेले काही दिवस नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा होती. स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीपासून  काँग्रेसपासून फारकत घेतली होती. त्यांच्यासोबत आणखी किती नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार ? हे गुलदस्त्यात होते. दरम्यान  सोमवारी, कोल्हापुरातून जवळपास वीस माजी नगरसेवक मुंबईकडे  रवाना झाले. त्यांच्या वेगवेगळया ठिकाणी राहण्याची सोय केली होती. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सरकारी निवासस्थानी मंगळवारी, सायंकाळी त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना फेटे बांधले होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये साऱ्यांचा पक्षप्रवेश झाला.पालकमंत्री आबिटकर यांनी माजी महापौर, उपमहापौर, विविध समित्यांचे सभापती मिळून २५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याचे सांगितले. 

............

 

प्रमुख कार्यकर्तेही शिवसेनेत

संजय सावंत, अभिजीत खतकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, सुजय चव्हाण, कुलदीप सावतरकर, पार्थ मुंडे, अनिल इंगळे, इजान नागरकटटी, विश्वविक्रम कांबळे, रघुनंदन भावे, आदर्श खडके, दत्ता हळवे, वसीम कांडेकर, अनिकेत कामत, बाबूराव बोडके, महेंद्र कोरडे, मुनीर पटेल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes