न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निर्मल लोहिया, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर, नेमचंद संघवी
schedule25 Jun 25 person by visibility 154 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निर्मल लोहिया, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर, नेमचंद संघवी यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सल्लागार विनोदकुमार लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. २०२५ ते २०३० या पाच वर्षाच्या कालावधीसाठी संस्थेच्या नवनियुक्त पदधिकाऱ्यांची निवड झाली. या बैठकीत संस्थेच्या सल्लागारपदी विनोदकुमार लोहिया यांची फेरनिवड झाली. संस्थेच्या सचिवपदी प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिवपदी प्राचार्य सुर्यकांत चव्हाण यांची निवड झाली. सदस्य म्हणून अनिल लोहिया, रवी गोयंका, राजेंद्र मालू, नरसिंह अस्वले, अरुण संघवी, कुशल रामाणी, डॉ. गिरीश वझे, प्रशांत लोहिया, वाय. एस. पोवार, प्रदीप पोवार, उत्कर्षा पाटील, सविता पाटील, संध्या पाटील, शिक्षक प्रतिनिधी अंजली आंबर्डेकर, उज्ज्वला जगदाळे यांची निवड झाली.