शाहू स्मारक भवनमध्ये लोकराजांवरील चित्रमय प्रदर्शन
schedule25 Jun 25 person by visibility 12 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे येथील शाहू स्मारक भवन येथे चित्रमय प्रदर्शन भरविले आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रे व त्यांनी काढलेले आदेश प्रदर्शनात मांडलेले आहेत. हे प्रदर्शन २४ ते २६ जून २०२५ या कालावधीत खुले आहे.शहर पोलिस उपअधीक्षक अजितकुमार टिके यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात, ‘राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावरील अनेक घटनांची चित्रमय मांडणी हे वैशिष्ट्य आहे. याशिवाय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण यासंबंधीचे आदेश मांडले आहेत.’असे महारासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले. उद्घटनप्रसंगी राज्य पणन महामंडळाचे सरव्यवस्थापक सुभाष घुले, उद्योजक सुरेंद्र जैन, व्ही. के. पाटील, सुरेश शिपूरकर, बबन रानगे, जयेश ओसवाल, शिवाजीराव परुळेकर आदी उपस्थित होते. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलजा भोसले यांनी आभार मानले. यावेळी सी. एम. गायकवाड, संजय कांबळे, विजय पाटील, महादेव पाटील, शंकरराव शेळके, बाजीराव नाईक, संयोगिता देसाई उपस्थित होते.