Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायमन्यू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निर्मल लोहिया, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर, नेमचंद संघवीशाहू स्मारक भवनमध्ये लोकराजांवरील चित्रमय प्रदर्शनसुनील कदम,शारंगधर देशमुखसह २५ नगरसेवक शिवसेनेत ! काँग्रेससोबत भाजप, राष्ट्रवादीलाही झटका !!शिरीष सप्रे प्रथम स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी पुस्तक प्रकाशन, सांगितीक कार्यक्रमकलाकार ओंकार भिसेच्या कुटुंबासाठी एकवटले संवेदनेचे हातमाहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी स्वीकारताना अटककोल्हापुरात राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, खेडकरांनी जिंकलीय पाच वेळा निवडणूकभाजप कोल्हापूरतर्फे श्यामाप्रसाद मुखर्जींना अभिवादन, आणीबाणीतील सत्याग्रहींचा सन्मानस्वतःच्या आवडीचे करिअर निवडा, यशस्वी भविष्य घडवता येते : रविंद्र खैरे

जाहिरात

 

शिरीष सप्रे प्रथम स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी पुस्तक प्रकाशन, सांगितीक कार्यक्रम

schedule24 Jun 25 person by visibility 38 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक, कला,संगीत आणि साहित्य  रसिक, पर्यावरण प्रेमी असे बहुआयामी व्यक्तिमत्व गुणीदास फाउंडेशन अध्यक्ष आणि यश मेटॅलिक्सचे  संस्थापक  कै शिरीष सप्रे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त  गुरुवारी, २६ जून २०२५ रोजी पुस्तक प्रकाशन आणि सांगितीक कार्यक्रम आयोजित केला आहे. अशी माहिती संयोजक राजसी सप्रे, आदित्य जाधव, राजप्रसाद धर्माधिकारी, डॉ. अजित शुक्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, पंडित हरिप्रसाद चौरासिया, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, आणि कवी सौमित्र यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सायंकाळी ४.४५ वाजता हा कार्यक्रम सायबर कॉलेज परिसरातील आनंद भुवन येथे कार्यक्रम होत आहे. सप्रे- जाधव कुटुंबीय आणि गुणीदास फाउंडेशनच्या सहयोगाने हा कार्यक्रम होत आहे. याप्रसंगी ‘प्रिय शिरीष...सप्रेम’  या पुस्तकाचे प्रकाशन आहे.

या पुस्तकात शिरीष सप्रे यांचा सहवास लाभलेले अनेक क्षेत्रातील त्यांचे मित्र, संगीत आणि उद्योग जगतातील मान्यवर यांनी आपल्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. तसेच शिरीष सप्रे यांच्या अनेक पैलूंवर  लघु लेख लिहिले आहेत. हे सर्वांपर्यंत पुस्तक रूपाने  पोचणार आहेत .सुप्रसिद्ध कवी आणि अभिनेते किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. या पुस्तकात ५१ लेख आहेत. या पत्रकार परिषदेवेळी दिलीप बनछोडे, अभय देशपांडे, दर्शन शिपूरकर, अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

………………………………….

राकेश अँड फ्रेंडस

शिरीष सप्रे यांना संगीत क्षेत्रातील  कलाकारांच्या वतीने सांगीतिक आदरांजली वाहण्यात येणार आहे.  भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्च्यात्य संगीताची कल्पक,प्रभावी गुंफण करून संगीताचे क्षितिज विस्तारणारे राकेश अँड फ्रेंड्स हे सादरीकरण ,ग्रॅमी पुरस्कार प्राप्त भारतीय संगीतातील सुप्रसिद्ध बासरीवादक पं.राकेश चौरसिया  यांच्या नेतृत्वाखाली संजोय दास सत्यजीत तळवलकर ,शेल्डन डिसिल्वा, संगीत हळदीपूर, विनायक पोळ या आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त अग्रगण्य वादकांच्या समूहा तर्फे ही अनोखी कलाकृती सादर होणार आहे. प्रवेश अग्रक्रमानुसार असून काही ओळी राखीव असतील तथापि प्रवेशासाठी प्रवेशिका असणे आवश्यक असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes