Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायमन्यू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निर्मल लोहिया, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर, नेमचंद संघवीशाहू स्मारक भवनमध्ये लोकराजांवरील चित्रमय प्रदर्शनसुनील कदम,शारंगधर देशमुखसह २५ नगरसेवक शिवसेनेत ! काँग्रेससोबत भाजप, राष्ट्रवादीलाही झटका !!शिरीष सप्रे प्रथम स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी पुस्तक प्रकाशन, सांगितीक कार्यक्रमकलाकार ओंकार भिसेच्या कुटुंबासाठी एकवटले संवेदनेचे हातमाहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी स्वीकारताना अटककोल्हापुरात राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, खेडकरांनी जिंकलीय पाच वेळा निवडणूकभाजप कोल्हापूरतर्फे श्यामाप्रसाद मुखर्जींना अभिवादन, आणीबाणीतील सत्याग्रहींचा सन्मानस्वतःच्या आवडीचे करिअर निवडा, यशस्वी भविष्य घडवता येते : रविंद्र खैरे

जाहिरात

 

माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी स्वीकारताना अटक

schedule24 Jun 25 person by visibility 730 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज भिमराव कोळीला खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा कागल परिसरातील लक्ष्मी टेकडी येथे खंडणी घेताना कोळी व त्याचा साथीदार युवराज मारुती खराडे या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. कोळीने सीपीआरमधील  वैद्यकीय उपकरण पुरवठादार अजिंक्य पाटीलकडे वीस लाखाची मागणी केली होती. पाटील यांच्याकडून तीस हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. वैद्यकीय उपकरण पुरवठादार पाटील यांच्या विरोधात कोळीने तक्रारी केल्या होत्या. वैद्यकीय उपकरण पुरवठाप्रकरणी पाटील यांना अटक झाली होती. दरम्यान भविष्यात त्रास देणार नाही यासाठी वीस लाख रुपयांची मागणी कोळीने केली होती असे तपासात पुढे आले आहे. कोळीने वीस लाखाची मागणी केली, त्यावर पाटील यांनी पंधरा लाख रुपये देण्याचे मान्य केले. कोळीकडून खंडणी मागितली जात असल्याची माहिती पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा लावला. त्यांनी आपल्याकडील तीस हजार रुपये पाटील यांना दिले. मध्यरात्री लक्ष्मी टेकडी येथे पाटील यांच्याकडून तीस लाख रुपयांची लाच स्वीकारताना कोळी याला पकडण्यात आले. कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. तसेच त्याच्याकडील मोटार व मोबाइलही जप्त केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes