Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायमन्यू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निर्मल लोहिया, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर, नेमचंद संघवीशाहू स्मारक भवनमध्ये लोकराजांवरील चित्रमय प्रदर्शनसुनील कदम,शारंगधर देशमुखसह २५ नगरसेवक शिवसेनेत ! काँग्रेससोबत भाजप, राष्ट्रवादीलाही झटका !!शिरीष सप्रे प्रथम स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी पुस्तक प्रकाशन, सांगितीक कार्यक्रमकलाकार ओंकार भिसेच्या कुटुंबासाठी एकवटले संवेदनेचे हातमाहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी स्वीकारताना अटककोल्हापुरात राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, खेडकरांनी जिंकलीय पाच वेळा निवडणूकभाजप कोल्हापूरतर्फे श्यामाप्रसाद मुखर्जींना अभिवादन, आणीबाणीतील सत्याग्रहींचा सन्मानस्वतःच्या आवडीचे करिअर निवडा, यशस्वी भविष्य घडवता येते : रविंद्र खैरे

जाहिरात

 

कोल्हापुरात राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, खेडकरांनी जिंकलीय पाच वेळा निवडणूक

schedule24 Jun 25 person by visibility 241 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेनेने नाराज नगरसेवकांवर फेकलेल्या जाळयात काँग्रेस पक्षासह भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नगरसेवकही गळाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी मुंबईत कोल्हापुरातील पंधराहून अधिक नगरसेवक शिवसेनेत सहभागी होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीशी निगडीत माजी नगरसेवक आनंदराव खेडकर, महिला-बाल कल्याण समितीच्या माजी सभापती अनुराधा सचिन खेडकर हे दोघे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक घेत एकजूटपणा दाखविला होता. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, ताकत देतो असे सांगितले होते. आठ दिवस उलटण्याअगोदरच राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेचा रस्ता धरला आहे. लक्षतीर्थ वसाहत प्रभागात खेडकर यांचा वरचष्मा आहे. पक्ष कोणताही असो, खेडकर विजयी असे समीकरण १९९५ पासून पाहावयास मिळत आहे. १९९५ मध्ये आनंदराव खेडकर हे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्थात २००० मधील निवडणुकीत त्यांच्या पत्नी मालती खेडकर या विजयी झाल्या. २००५ मधील निवडणुकीत आनंदराव खेडकर यांच्या स्नुषा अनुराधा सचिन खेडकर विजयी झाल्या.

 २०१० मधील पंचवार्षिक निवडणुकीत आनंदराव यांचे पुत्र सचिन खेडकर हे विजयी झाले. राष्ट्रवादीकडून त्यांनी निवडणूक लढविली होती. सचिन खेडकर हे उपमहापौर होते.२०१५ मध्ये पुन्हा अनुराधा खेडकर निवडून आल्या. राष्ट्रवादीकडून त्यांनी निवडणूक लढविली होती. महिला व बालकल्याण समिती सभापती होत्या. २०२० मध्ये सभागृहाची मुदत संपली. खेडकर कुटुंबीय राष्ट्रवादी सोबत होते. काही दिवसापूर्वी मंत्री मुश्रीफ यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्या बैठकीला आनंदराव खेडकर उपस्थित होते. आता त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी आनंदराव खेडकर व अनुराधा खेडकर दोघेही मुंबईला गेले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes