Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला जोरदार प्रतिसादमहापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी काँग्रेसची समिती, चार दिवस मित्रपक्षांशी चर्चासातारा-कागल महामार्गाच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा : खासदार धनंजय महाडिककोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण समारंभअभ्यासाचा भोंगा…!सतेज पाटलांनी गाजविली विधान परिषद, गृहखात्यासह सरकारच्या कामकाजाचे काढले वाभाडेदर्पण फाउंडेशन-रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी उमंग २०२६ समूहनृत्य स्पर्धाखाजगी प्राथमिक शिक्षकच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षणाधिकाऱ्यांची भेटबालकल्याण संकुलमधील कन्येचा मंगळवारी विवाह, पत्रकार - अधिकारी दांपत्य करणार वधूचे पालकत्वप्रा. प्रविण विलासराव सावंत यांना पीएचडी

जाहिरात

 

शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला जोरदार प्रतिसाद

schedule12 Dec 25 person by visibility 78 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सुचनेनुसार "मिशन कोल्हापूर महानगरपालिका" अंतर्गत शिवसेना इच्छुक उमेदवारांची कार्यशाळा राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे पार पडली. या कार्यशाळेला जोरदार प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेत्या माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव होत्या.

या कार्यशाळेला शिवसेना निवडणूक राज्य समन्वयक वैभव वाघ यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरात शहर आणि गावपातळीवर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष सुरु करण्यात येत आहेत. याद्वारे गाव आणि प्रभाग पातळीपर्यंत सहाय्यता कक्ष स्थापन करा. यामाध्यमातून शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचवा.’

शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव यांनी, योजनांचा लाभ राज्यातील सर्वच घटकातील नागरिकांना झाला आहे. यामुळेच मतदारही महायुती सरकारच्या पाठीशी ठाम उभे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता कसभरही कमी झालेली नाही. महानगरपालिकेवर भगवा फडकवूया, असे आवाहन केले.

या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक मयूर कदम यांनी मार्गदर्शन केले. उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, दीपक चव्हाण, उदय भोसले, रणजीत मंडलिक, सुनील खोत, राज भोरी, सुनील जाधव, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, दुर्गेश लिंग्रस, अरविंद मेढे, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, अजित मोरे, प्रवीण लिमकर, आश्पाक आजरेकर, सनी अतिग्रे, निलेश हंकारे, रविंद्र पाटील, कृष्णा लोंढे, आदर्श जाधव, पियुष चव्हाण, सौरभ कुलकर्णी, अविनाश कामते, कपिल पोवार आदी उपस्थित होते. 

कोल्हापुरात भगवा फडकणार राजेश क्षीरसागरांना कॉन्फिडन्स

वाघ म्हणाले, ‘माझ्याकडे राज्यातील ६ जिल्ह्यांचे निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी आहे.आमदार राजेश क्षीरसागर हे अधिवेशनानिमित्त नागपूर येथे आहेत. त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क झाला असता त्यांनी कोल्हापुरात भगवा फडकविणारच असा कॉन्फिडन्स व्यक्त केला. शिवसेनेकडे इच्छुक उमेदवार तगडे आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांची लढण्याची तयारी, सरकारी योजनांची शिदोरी आणि उमेदवारांचा दांडगा जनसंपर्क याचमुळे कोल्हापूरच्या नेत्यांनाही कॉन्फीडन्स आहे.,’

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes