कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण समारंभ
schedule12 Dec 25 person by visibility 43 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे औद्योगिक क्षेत्रात गौरवपूर्ण कामगिरी करणा-या उद्योजकांना ‘उद्योगश्री’ आणि जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. असोसिएशनमार्फत यंदाच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. रविवारी, चौदा डिसेंबर २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता पुरस्कार उद्योगपती माधवराव बुधले सभागृह, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शिवाजी उद्यमनगर येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मे.कूपर कार्पोरेशन चेअरमन व कार्यकारी संचालक फारूख एन.कूपर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी दिली.
इंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे यंदा, केईए उद्योगश्री पुरस्कार हा मे,सुनिल इंडस्ट्रीजच्या श्रीमती सुनील विद्या सुनील माने, मे. महाराष्ट्र इंजिनीअर्सचे नितीन मोहन वाडीकर यांना दिला जाणार आहेत. तसेच मे. मिराशा शेपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे स्वर्गीय रणजीत रुपचंद शाह यांना मरणोत्तर ‘उद्योगश्री’पुरस्कार जाहीर झाला. असोसिएशनतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार हा मे. ब्राईट स्टील इंजिनीअर्सचे स्वर्गीय नारायण आत्माराम उर्फ नाना तेंडूलकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण समारंभात असोसिएशनच्या ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळीअध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, सेक्रेटरी कुशल सामाणी, टेªझरर प्रसन्न तेरदाळकर, संचालक संजय अंगडी, नितीन वाडीकर, अतुल आरवाडे, अमर करांडे,प्रदीप व्हरांबळे उपस्थित होते.