प्रा. प्रविण विलासराव सावंत यांना पीएचडी
schedule11 Dec 25 person by visibility 36 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील प्रा. प्रविण विलासराव सावंत यांना पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी, ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग अँड इव्हॉल्यूएशन युजिंग वायरलेस सेन्सर नेटवर्क’ याविषयावरील प्रबंध शिवाजी विद्यापीठाकडे सादर केला होता. केआयटी येथील ईटीसी विभागप्रमुख प्रा. डॉ. वाय. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी केली. या संशोधनासाठी प्रा. सावंत यांना, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई येथील कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव व्ही. एन. शिंदे, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक डॉ. ए. बी. कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.