खाजगी प्राथमिक शिक्षकच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षणाधिकाऱ्यांची भेट
schedule11 Dec 25 person by visibility 54 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गतवर्षीच्या थकीतसह यावर्षीच्या वेतनेतर अनुदानाची मागणी सरकारीस्तरावर करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्याकडे केली. जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांचे गतवर्षीचे अनुदान शाळांना प्राप्त झालेली नाही. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्य शासनाकडे वेतनेतर अनुदान करण्यासाठी संपूर्ण अधिकार जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देण्यात आले आहेत.तरी जिल्ह्यातील सर्व शाळांचे गतवर्षीचे व या वर्षीचे वेतनेतर अनुदानाची मागणी सरकारस्तरावर करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. शिष्टमंडळात खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, सल्लागार एम.डी.पाटील, विभागीय सचिव राजाराम संकपाळ, जिल्हा सचिव नितीन पानारी, शहराध्यक्ष संतोष पाटील, करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे उपस्थित होते.