Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सतेज पाटलांनी गाजविली विधान परिषद, गृहखात्यासह सरकारच्या कामकाजाचे काढले वाभाडेदर्पण फाउंडेशन-रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी उमंग २०२६ समूहनृत्य स्पर्धाखाजगी प्राथमिक शिक्षकच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षणाधिकाऱ्यांची भेटबालकल्याण संकुलमधील कन्येचा मंगळवारी विवाह, पत्रकार - अधिकारी दांपत्य करणार वधूचे पालकत्वप्रा. प्रविण विलासराव सावंत यांना पीएचडीऔद्योगिक न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल, २२८५ कंत्राटी कामगार कायम सेवेत  करा  !शिवसेनेतर्फे शुक्रवारी इच्छुक उमेदवारांची प्रशिक्षण कार्यशाळालेटलतिफांवर कारवाईचा डोस, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दहा कर्मचाऱ्यांना नोटीसडॉ. जे. एल. नागांवकर, डॉ. शशिकांत कुलकर्णींना जीवन गौरव पुरस्कारस्ट्राँग रुमसमोरील खाजगी सीसीटीव्ही काढण्याचा प्रशासनाचा काय अधिकार? सतेज पाटीलांची अधिवेशनात विचारणा

जाहिरात

 

सतेज पाटलांनी गाजविली विधान परिषद, गृहखात्यासह सरकारच्या कामकाजाचे काढले वाभाडे

schedule11 Dec 25 person by visibility 22 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  :  सध्या महाराष्ट्रात दररोज खून आणि २३ बलात्काराच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे महाराष्ट्राच्या कायदा सुवव्यवस्थेवर डाग पडला असून गृहविभाग काय करतोय असा सवाल काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी विधिमंडळात उपस्थित केला. आमदार पाटील यांनी तडाखेबाज भाषण करत सरकारच्या कामकाजाचे वाभाडे काढले. राज्यातील विविध प्रश्नांचा ऊहापोह करत त्यांनी सरकारच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आमदार पाटील म्हणाले, पुण्यात कोयता गँग सक्रिय आहेत. राज्यातील महिला आणि मुली अत्याचाराला बळी पडत आहेत. संतोष देशमुख प्रकरण असेल, डॉ. संपदा मुंडे प्रकरण असेल अशा घटनांमुळे महाराष्ट्राच्या कायदा सुवव्यवस्थेवर डाग पडला असल्याची टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले, पुरवणी मागणी ही आकस्मिक निधीसाठी असताना निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन केलेली पुर्वनियोजित उधळपट्टी आहे. ती राज्याच्या आर्थिक स्थैर्यावर घाला घालणारी, आणि काही मोजक्यात लोकांचे हित जपणारी आहे. सरकारने आर्थिक शिस्त कुठे? प्राधान्यक्रम कुठे? आणि जनतेचे हित कुठे? याचे उत्तर दिले पाहीजे अशी मागणीही आमदार पाटील यांनी सरकारडे केली.

’राज्य सरकारने आणलेल्या पुरवणी मागण्या या आर्थिक गरजेपेक्षा निवडणूकपूर्व राजकीय स्वार्थाने प्रेरित आहेत. . लाख कोटींचे बजेट आता लाख ९० हजार कोटींवर पोहोचले आहे. त्यामूळे मुळ अर्थसंकल्प तब्बल १७. ५३ टक्क्यांनी फुगवला आहे. राज्याचे एकूण कर्ज ,३२,००० कोटी वाढून प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ८२ हजारांचे कर्ज वाढले आहे. ही वाढ म्हणजे आर्थिक शिस्तीचा भंग आणि सरकारकडे कोणतीही दूरदृष्टी नसल्याचे द्योतक असल्याची टीकाही त्यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्यात ४० हजार कोटींची देयके प्रलंबित असल्याने कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या वाढत आहेत. भ्रष्टाचारामुळे राज्यातील रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत.’असा आरोपही आमदार पाटील यांनी केला

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes