महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी काँग्रेसची समिती, चार दिवस मित्रपक्षांशी चर्चा
schedule12 Dec 25 person by visibility 56 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून लढण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. या निवडणुकीत घटक पक्षांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसने समिती नेमली आहे. ही समिती शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट व इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी १३ ते १६ डिसेंबर या कालावधीत चर्चा करुन त्याचा अहवाल १७ डिसेंबरला काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते तथा जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना देणार आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर, राजेश लाटकर, भारती पोवार, आनंद माने, तौफिक मुलानी, विक्रम जरग व भरत रसाळे यांची समिती इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करणार आहे. यामध्ये जागांच्या अपेक्षा, प्रभागनिहाय ताकद व पक्षांचे मत यावर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर आघाडीबाबतचा निर्णय घेतला जाईल.