दर्पण फाउंडेशन-रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी उमंग २०२६ समूहनृत्य स्पर्धा
schedule11 Dec 25 person by visibility 25 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल आणि दर्पण फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उमंग २०२६’ समूहनृत्य स्पर्धा आयोजित केले आहे. यामध्ये देशभक्तीपर आणि लोकनृत्य स्पर्धेचा समावेश आहे. ही स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा यांच्यासाठी मर्यादित आहे. स्पर्धेसाठी केवळ देशभक्तीपर आणि लोकनृत्य गीताचाच सहभाग घेता येईल, प्रत्येक संघात किमान दहा आणि कमाल वीस विद्यार्थी संख्या मर्यादित आहे. समूहनृत्याचे गाणे केवळ ऑडिओ रूपात असेल. गाणे पेन ड्राइव्ह किंवा मिडिया च्या माध्यमातून संयोजकाकडे द्यावे. परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल. निकालाबाबत कोणाचीही कोणतीही तक्रार असणार नाही. प्रत्येक नृत्य सादरीकरणाची वेळ ही पाच ते सहा मिनिटे असेल.प्रत्येक शाळांनी वेशभूषा आणि मेकअप स्वतः करून आणावयाचे आहे. स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर लगेच जाहीर केला जाईल. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना रोख सात हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास रोख पाच हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना तीन हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे बक्षीस आहे. सर्व सहभागी शाळा आणि विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. ही स्पर्धा शालेय गटात इयत्ता तिसरी ते सातवीचे विद्यार्थी गटात होईल.
स्पर्धेसाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख २५ डिसेंबर २०२५ अशी आहे. समूहनृत्य स्पर्धा जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात होईल. ज्यांना स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे अशा शाळांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेकरिता नावनोंदणीसाठी दर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील (मो.नं. 9096413499), रोटरीचे इव्हेंट चेअरमन अभिजीत माने (98231 52996), फाऊंडेशनचे उपाध्यक्ष राम भोळे (7709744027), फाऊंडेशनचे सचिव संजय कडगावे (9850045019), सहसचिव सचिन यादव (7741973636), कार्याध्यक्ष अरुण गोते (9975440452), खजानिस युवराज सरनाईक (9881912765), संचालक श्रीपाद रामदासी (9923757373), संजय पाटील (9404423130), महादेव डावरे (9923903536) यांच्याशी संपर्क साधावा.