राज्यस्तरीय महामंडळ सभेला राज्यभरातील पदाधिकारी ! १७०० हून अधिक शिक्षक !!
schedule04 Oct 25 person by visibility 37 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे (थोरात गट) आयोजित राज्यस्तरीय महामंडळ सभा रविवारी (पाच ऑक्टोबर २०२५) होत आहे. या सभेला राज्यभरातील पदाधिकारी आणि पाच जिल्ह्यातील १७०० हून अधिक शिक्षकांचा सहभाग असणार आहे. कळंबा नजीक जय पॅलेस येथे ही सभा होत आहे. सकाळी ११ वाजल्यापासून प्रारंभ होत आहे. शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे हे प्रमुख मार्गदर्शक आहेत. या सभेत टीईटी सक्तीच्या विरोधात निर्णायक लढा, शिक्षण सेवक पद रद्द करणे आणि संचमान्यतेचा जाचक आदेश रद्द करण्यासंबंधी पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. दरम्यान कोल्हापुरात होत असलेल्या या सभेला पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तुषार पाटील, शिक्षक संघ माजी आमदार शिवाजीराव पाटील गटाचे जिल्ह्यातील पदाधिकारी संतोष भोसले, एम. एन. गुरव व कोल्हापूर शहरातील अनेक शिक्षक प्राथमिक शिक्षक संघ थोरात गटात प्रवेश करणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष रवी पाटील व जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील यांनी दिली.