राष्ट्रवादीचे आमदारपुत्र भाजपात जाणार, शरद लाड हाती घेणार कमळ !
schedule03 Oct 25 person by visibility 204 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या दोन-तीन दिवसात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे कुंडल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी एका कार्यक्रमासाठी जाणार आहेत. त्या वेळी पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. येत्या सात ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा त्यानंतर काही दिवसात त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे. शरद लाड हे क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे (कुंडल) चेअरमन आहेत. गेले काही दिवस त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली होती. शरद लाड हे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत.विलिंग्डन कॉलेजमधून बीएस्सी झाले आहेत. जिल्हा परिषदेवरही ते निवडून आले होते. तसेच जिल्हा नियोजन समितीतही त्यांनी काम केले आहे. विजयादशमी निमित्त सांगली येथे दुर्गामाता दौड आयोजित केली होती. त्यामध्ये शरद लाड सहभागी झाले होते