प्रमोद बराले निलंबित ! रमेश मस्कर, हर्षजीत घाटगेसह चौघांना नोटीस!!
schedule04 Oct 25 person by visibility 315 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश आबीटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (तीन ऑक्टोबर २०२५) महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीनंतर प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी अॅक्शन मोडवर आल्या. फुलेवाडीतील अग्निशमन दलाच्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटनेप्रकरणी उपशहर अभियंता प्रमोल बराले यांना निलंबित केले. तसेज शहर अभियंता रमेश मस्कर व उप-शहर अभियंता सुरेश पाटील यांची खातेनिहाय चौकशी का करु नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
तसेच शहरामध्ये गणेश उत्सवाच्या कालावधीत आठ दिवस पाणी पुरवठा खंडीत होऊन नागरीकांना नाहक त्रास झालेबद्दल जल अभियंता हर्षजीत घाटगे व सहा.अभियंता यांत्रिकी जयेश जाधव यांची खोत निहाय चौकशी का करण्यात येऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शहरातील विविध विकासकामांच्या आढावा घेण्यासाठी शुक्रवारी महापालिकेत आढावा बैठक झाली. यावेळी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या कामकाजाचे वाभाडे काढले. शिवाय कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कडक कारवाईच्या सूचना केल्या.
शहराच्या सर्वांगिण विकासासाठी रस्ते पाणीपुरवठा, पार्किंग व इतर आवश्यक सोई सुविधांचा विचार करुन व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेप्रमाणे महापानगरपालिकेने ब्लू लाईनमधील 100 फुटी रस्ता संपादन करणेकामी नगर विकास विभागास प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या खुल्या जागांना नांव लावणेची कार्यवाही करणे तसेच खुल्या जागेवरील अतिक्रमण निष्कासीत करणेची कारवाई करण्याचे नगरचना विभागास सूचना दिल्या आहेत.
शहरातील शंभर कोटी निधीमधील व इतर रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वॉलीटी टेस्टींग एजन्सी मार्फत तपासणी करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत. तसेच त्यानुसार संबधीत ठेकेदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच फुलेवाडी फायर स्टेशन इमारत दुर्घटना प्रकरणीही या एजन्सीमार्फत तांत्रिक लेखापरिक्षण करण्याचे आदेश काढले. तसेच काळम्मावाडी येथील पंपींग मशनरी वावंवार बंद पडणे व गणेश उत्सवाच्या कालावधीत आठ दिवस बंद पडलेने याची सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंत्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत त्यांना अकरा ऑक्टोंबर पर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत