प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा रविवारी ! संभाजीराव थोरात, बाळासाहेब मारणे मार्गदर्शन करणार !!
schedule03 Oct 25 person by visibility 302 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा जय पॅलेस हॉल कोल्हापूर गारगोटी रोड कळंबा येथे पाच ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता होत आहे. सभेस महाराष्ट्र राज्याचे शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे व राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारणीतील पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील व सरचिटणीस सुनील पाटील यांनी दिली . सुप्रीम कोर्ट यांनी दिलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बाबतच्या विषयावर तसेच शिक्षण सेवक पद कायमस्वरूपी रद्द करावे. 2005 नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. एम एस सी आय टी वसुलीचा शासन निर्णय रद्द करावा तसेच 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार शिक्षक संच मान्यता निकष रद्द करून पूर्वीप्रमाणेच संच मान्यता करण्यात यावी. महानगरपालिका नगरपालिका शिक्षकांना वेतनासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात यावे यासह इतर विषयावर महामंडळ सभेमध्ये सविस्तर चर्चा होऊन टीईटीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात फेर याचिका दाखल करण्याची बाबत निर्णय घेण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक उपस्थित राहणार असून सदरची महामंडळ सभा व्यवस्थित रित्या पार पडण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष श्री विलास चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षक संघ व इतर कार्यकारणी कष्ट घेत आहे सदरच्या सभेस कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांनी उपस्थित राहून सभा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण संघाचे पदाधिकारी एस व्ही पाटील ,रघु आप्पा खोत, एन वाय पाटील , मामा भोसले, आनंदराव जाधव , मधुकर येसने, रावसाहेब देसाई , शिक्षक बँकेचे अध्यक्ष शिवाजी रोडे पाटील, बाळासाहेब निंबाळकर, जीवन मिठारी , डी आर पाटील, अरुण चाळके , दुन्देश खामकर , विशाल प्रभावळे, प्रकाश मगदूम ळ जयवंत पाटील यांच्यासह प्राथमिक शिक्षक बँकेचे सर्व संचालक तसेच जिल्हा कार्यकारणीतील सदस्य उपस्थित होते.