Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राज्यस्तरीय महामंडळ सभेला राज्यभरातील पदाधिकारी ! १७०० हून अधिक शिक्षक !!कौस्तुभ गावडेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, २०० रक्तदात्यांचा सहभागजिल्हा परिषदेतर्फे सोमवारी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणदहा हजार जातिवंत म्हैशी जिल्ह्यात आणू या ! २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठू -मंत्री हसन मुश्रीफप्रमोद बराले निलंबित ! रमेश मस्कर, हर्षजीत घाटगेसह चौघांना नोटीस!!शिवाजी विद्यापीठाच्या आयडिया लॅबसाठी मेनन समूहाकडून पन्नास लाखाचा निधीआमदारांच्या प्रश्नावर महापालिका अधिकाऱ्यांची भंबेरी, पालकमंत्र्यांनी दिला आठ दिवसाचा अल्टिमेटमराष्ट्रवादीचे आमदारपुत्र भाजपात जाणार, शरद लाड हाती घेणार कमळ !मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार ! राजेश क्षीरसागरांचा सतेज पाटलांच्यावर पलटवार प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा रविवारी ! संभाजीराव थोरात, बाळासाहेब मारणे मार्गदर्शन करणार !!

जाहिरात

 

आमदारांच्या प्रश्नावर महापालिका अधिकाऱ्यांची भंबेरी, पालकमंत्र्यांनी दिला आठ दिवसाचा अल्टिमेटम

schedule03 Oct 25 person by visibility 108 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील खराब रस्ते, अपुरा पाणी पुरवठा, पार्किंगच्या नियोजनाचा अभाव, खुल्या जागेवरील अतिक्रमण अशा विविध विषयावरुन आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर महापालिका अधिकाऱ्यांची उत्तरे देताना भंबेरी उडाली. आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांनी शहरवासियांच्या प्रश्नावरुन महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढील आठ दिवसांत शहराच्या परिपूर्ण विकासाचा आराखडा तयार करावा.  टप्प्याटप्प्याने प्रभावी अंमलबजावणी करावी असे अल्टिमेटम दिले. १३ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सुयंक्त बैठक घेऊन महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊ असे सांगितले. तसेच या बैठकीत पालकमंत्री आबिटकर यांनी, शहरातील विविध रस्ते व बांधकामाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वॉलिटी कंट्रोलतर्फे तपासणी करुन वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

शहरातील विविध प्रश्नांची सोडवणूक, विकास योजनांची सध्यस्थिती यासंबधी शुक्रवारी (३ ऑक्टोबर २०२५) महापालिकेत आढावा बैठक घेतली. पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महापालिका प्रशासन के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, नगर रचना विभागातील प्रमुख विनय झगडे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, सुधाकर चल्लावाड, डॉ. प्रकाश पावरा यांच्यासह विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.गणेशोत्सव कालावधीत शहरात आठ दिवस पाणी पुरवठा ठप्प होता, या प्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करुन तत्काळ कारवाई करा. तसेच फुलेवाडी येथील अग्निशमन दलाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. महापालिकेच्या खुल्या जागेवर नाव लावणे व अतिक्रमण हटविणे यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना केल्या. ते अधिकारी कामात हलगर्जीपणा करतील त्यांना घरी पाठवा असा सज्जड दमही त्यांनी भरला.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी, बैठकीच्या प्रारंभीच महापालिकेच्या खुल्या जागेवर अनधिकृत बांधकाम झाल्याचे निदर्शनास आणले. महापालिकेचे अधिकारी काय करतात, ओपन स्पेसवर बांधकाम करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही. महापालिका प्रशासन कोण चालविते ? अधिकारी की गुंड ? अशा शब्दांत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ‘शंभर कोटीच्या रस्त्यावरुनही त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. राज्य सरकार कोल्हापूरच्या विकासासाठी निधी देते, प्राप्त निधीतून दर्जेदार कामे का होत नाहीत. महापालिकेकडे ३९ टक्के कर्मचारी नाहीत. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न होत नाहीत. उत्पन्वाढीसाठी ३०० पत्रे महापालिका प्रशासनाला दिली. एकाही पत्रावर कार्यवाही नाही.’अशा शब्दांत समाचार घेतला. प्रशासक के. मंजुलक्ष्मी व शहर अभियंता रमेश मस्कर यांनी रस्त्याची कामे सुरू आहेत. पावसामुळे काही कामे रखडली. मुदतीत कामे न झालेल्या ठेकेदारांवर कारवाई करत असल्याचे सांगितले. आमदार अमल महाडिक यांनी, ‘महापालिका अधिकाऱ्यांनी गांभीर्याने कामे करावीत. शहर विकासाच्या योजनांचा प्राधान्यक्रम ठरवून अंमलबजावणी करावी. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्रानुसार कार्यवाही झाली पाहिजे. योजनेचा प्रारंभ व अंमलबजावणी करताना लोकप्रतिनिधींना सामावून घ्या’अशा सूचना केल्या. शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजित कदम, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनीही शहरवासियांना विविध सोयीसाठी हेलपाटे मारावे लागतात. याकडे लक्ष वेधत महापालिका अधिकाऱ्यांनी कामकाजात सुधारणा करावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या. अभिजीत खतकर यांनी फुलेवाडी रिंगरोड परिसरातील नागरी विषय मांडले.

साऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना समज दिली. महापालिकेतील वरिष्ठ पदे ही केवळ मानासाठी, मिरवण्यासाठी नाहीत. प्रत्येकाने जबाबदारी घेऊन काम करावे. जे अधिकारी काम करत नाहीत, त्यांना निलंबित करा. कोणत्याही प्रकरणात कनिष्ठ अधिकाऱ्यावर जबाबदारी ढलकून नामानिराळे होता येणार नाही. काही चुका झाल्यास पहिल्यांदा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करा असेही त्यांनी सुनावले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes