जिल्हा परिषदेतर्फे सोमवारी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
schedule04 Oct 25 person by visibility 41 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सोमवारी (सहा ऑक्टोबर २०२५ ) ‘२०२४-२५ व २०२५-२६ या वर्षाचे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. याप्रसंगी ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ पुरस्कार वितरणही करण्यात येणार आहे. महासैनिक दरबार हॉल येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होत आहे.राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, लोकसभेचे खासदार शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती असेल. जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचे प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी कळविले आहे.