Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
श्री.आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रमआंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संवाद, तरुण खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप ! कोल्हापूर बॅडमिंटनचा सुवर्णसोहळा !!व्यापारी-उद्योजकांमध्ये शुक्रवारपासून रंगणार क्रिकेट सामनेकेडीसीसी बँकेच्या २५ अधिकाऱ्यांना व्यवस्थापक-उपव्यवस्थापकपदी बढत्या न्यू कॉलेजमध्ये सतरा जानेवारीला राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धायु-डायस प्रणालीत राज्यस्तरावर कोल्हापूर जिल्हयाचा गौरव, दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांचा पुण्यात सन्मान !!मारुतराव कातवरे हे समाजसेवेतील वेडा कुंभार - आमदार सतेज पाटीलमाध्यम क्षेत्रातील स्थित्यंतरामुळे न गोंधळता, संधी शोधत कर्तृत्व दाखवा –कुलगुरू डी टी शिर्के प्राधिकरणच्या चौकशीला ‘ब्रेक’ ! प्रशासनावर दबाव, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशही बाजूला !!सायबरमध्ये पर्यावरण सजगता- तरुणांची जबाबदारी या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा 

जाहिरात

 

न्यू कॉलेजमध्ये सतरा जानेवारीला राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

schedule13 Jan 25 person by visibility 379 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय डी. बी. पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा शुक्रवारी, (१७ जानेवारी २०२५) रोजी आयोजित केल आहे. न्यू कॉलेज येथे सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य व्ही. एम. पाटील व  स्पर्धेचे प्रमुख प्रा. विनय पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

स्पर्धेसाठी यंदा सहा विषय आहेत. यामध्ये ‘शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची प्रस्तुतता, उद्योगातील रत्न –रतन टाटा, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरची मराठी, ’ती’ची सुरक्षितता-जबाबदारी कोणाची ?, भारतीय किसान आणि राजकारण, समजून घेऊ या ड्रोन तंत्रज्ञान’या विषयांचा समावेश आहे.  ही स्पर्धा सिनीअर कॉलेजमधील विद्यार्थी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठीच आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला दहा हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक विजेत्याला सात हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांक विजेत्याला पाच हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र असे बक्षीस  आहे. चतुर्थ क्रमांक विजेत्याला दोन हजार रुपये चषक व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ दोन बक्षीसे आहेत. यामध्ये प्रत्येकी एक हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी नावनोंदणी फी २०० रुपये आहे. तत्काळ नोंदणी फी २५० इतकी आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी व फी ऑनलाइन भरण्याची सुविधा आहे. nck30.cl@unishivaji.ac.in  या मेल आयडीवर नोंदणी करू शकतात. तर बँक ऑफ महाराष्ट्र खरी कॉर्नर कोल्हापूर ६०२३२७८९१२८, आयएसएफसी कोड MAHB000326 असा आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्पर्धेच्या मुख्य समन्वयक प्रा. डॉ. कविता गगराणी (९७६४४६९९०८), प्रा. अविनाश पाटील (९६८९६४६२४८) यांच्याशी संपर्क साधावा.

वक्तृत्वाच्या माध्यमातून सजग, संपन्न व्यक्तिमत्वाची जडणघडण व्हावी, नवीन अभ्यासू नेतृत्व निर्माण व्हावे या उद्दशाने मा. डी. बी. पाटील व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रम समिती आणि न्यू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित केली जाते. पत्रकार परिषदेला रजिस्ट्रार श्रीमती एम. वाय कांबळे, स्पर्धा समन्वयक प्रा. कविता  गगराणी, प्रा. अवनीश पाटील, प्रा. डॉ. मनीषा नायकवडी, प्रा. उमा गायकवाड, प्रा. प्रतिक चेंडके, चेतन पाटोळे आदी उपस्थित होते.

…………………………………………

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes