सायबरमध्ये पर्यावरण सजगता- तरुणांची जबाबदारी या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा
schedule12 Jan 25 person by visibility 35 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग सायबर महाविद्यालय व लक्ष्मी फाउंडेशन गर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी, (१३ जानेवारी २०२५) पर्यावरण सजगता- तरुणांची जबाबदारी या विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे. सायबर येथे सकाळी दहा वाजता कार्यशाळेचा प्रारंभ होणार आहे. यामध्ये किर्लोस्करचे एचआर प्रमुख हरीश सैवे, कर्नाटकामधील पर्यावरण तज्ञ डॉ. डी.एन. मिसाळे, गोव्यामधील फीडबॅक फाउंडेशन या कचरा व्यवस्थापन कंपनीचे व्यवस्थापक बालाजी केंद्रे मार्गदर्शन करणार आहेत. विविध महाविद्यालयातील तरुणांनी आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दीपक भोसले, शरद आजगेकर व विनायक देसाई यांनी यांनी केले आहे.