मारुतराव कातवरे हे समाजसेवेतील वेडा कुंभार - आमदार सतेज पाटील
schedule13 Jan 25 person by visibility 68 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘माजी महापौर मारुतराव कातवरे यांनी समाजसाठी केलेले काम अविस्मरणीय आहे. कातवरे म्हणजे समाजसेवेतील वेडा कुंभार होय. त्यांनी सामाजिक भावनेतून केलेले कार्य कौतुकास्पद आहे.’असे गौरवोद्गार आमदार सतेज पाटील यांनी काढले.
माजी महापौर मारुतराव कातवरे यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा आणि अमृत- कलश गौरव अंक प्रकाशन समारंभ रविवारी (१२ जानेवारी २०२५) झाला.याप्रसंगी माजी महापौर कातवरे, मंगल कातवरे यांचा सत्कार करण्यात आला. कातवरे यांचा मानपत्र, कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी शिर्के, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, माजी महापौर आर. के. पोवार, महादेवराव आडगुळे, भाकपचे नेते दिलीप पवार, कुंभार विकास सामाजिक संस्थेचे राज्याध्यक्ष सतीश दरेकर, प्राचार्य प्रकाश कुंभार, सतीश कुंभार, अनिल घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू शिर्के यांनी भाषणात कातवरे यांच्या कार्याचे कौतुक केले. कातवरे हे समाजाप्रती तळमळीने काम करणारे व्यक्तिमत्व आहे. पुढाकार घेऊन त्यांनी समाजाच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. सत्काराला उत्तर देताना कातवरे यांनी जीवनप्रवास उलगडला. रिक्षा व्यावसायिक, लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी धडपड, पुढे नगरसेवक, उपमहापौर, महापौर हा सारा प्रवास त्यांनी कथन केला. आयुष्यात माणसे कमविली, जी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडली असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी नगरसेवक सुभाष बुचडे, सुरेश शिपुरकर, बबनराव वडणगेकर, संभाजी ठाणेकर, मनोहर पाडळकर उपस्थित होते.