श्री.आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रम
schedule14 Jan 25 person by visibility 25 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वाचन संस्कृती वाढविण्यासाठी तसेच तरुण पिढीला ग्रंथाकडे आकर्षित करण्यासाठी श्री.आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल येथे वाचन संकल्प उपक्रम साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमर चौगले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यात ग्रंथालय विभागाद्वारे सामूहिक ग्रंथवाचन व विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या ग्रंथाचे एक तास वाचन केले. तसेच वाचनानंतर प्रत्येक मुलांनी त्यामधील सारांश एक एकमेकांबरोबर कथन केले. या उपक्रमामुळे मुलांच्या मध्ये विशेष आनंद दिसून आला.
वाचन पंधरवडा निमित्त महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनीचे, ग्रंथ परीक्षण स्पर्धेचे, व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य चौगले यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे अयोजन कॉलेजचे ग्रंथपाल प्रवीण यादव यानी केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अर्जुन आबिटकर, धीरज देसाई यांनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.